एप्रिलमध्ये बेरोजगारीमध्ये वाढ, ७.८३ टक्के बेरोजगारीचा दर

एप्रिलमध्ये बेरोजगारीमध्ये वाढ, ७.८३ टक्के बेरोजगारीचा दर

नवी दिल्लीः देशात एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर ७.८३ टक्के इतका झाला असून मार्चमध्ये तो ७.६० टक्के इतका होता, अशी आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन

बंगालमध्ये नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक
आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला
‘केरळ विधानसभेचा नागरिकत्व कायद्याला विरोध घटनाबाह्य’

नवी दिल्लीः देशात एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर ७.८३ टक्के इतका झाला असून मार्चमध्ये तो ७.६० टक्के इतका होता, अशी आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केली आहे. सीएमआयई दर महिन्याला देशातील बेरोजगारीचा आढावा घेत असते. त्यानुसार एप्रिल महिन्यात शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.२२ टक्के इतका झाला आहे. मार्चमध्ये तो ८.२८ टक्के इतका होता. तर ग्रामीण भागात गेल्या महिन्याच्या तुलनेत ७.१८ टक्क्याहून ७.२९ टक्के इतका वाढला आहे.

देशातील सर्वाधिक बेरोजगारीचा दर हरियाणात ३४.५ टक्के व त्यानंतर राजस्थानात २८.८ टक्के इतका नोंदला गेला आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक सुधारणांना वेग नसल्याने व महागाई वाढत असल्याने बेरोजगारी वाढत चालली आहे.

सिंगापूरच्या कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या अर्थतज्ज्ञ शीलन शाह यांच्या मते मार्चमध्ये चलनवाढीचा वेग ६.९५ टक्के इतका पोहचला होता, तो गेल्या १७ महिन्यातला सर्वाधिक नोंदला गेला आहे. या वर्षाखेर चलनवाढीचा वेग ७.५ टक्के इतका राहील असा अंदाज शाह यांनी वर्तवला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0