हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडा

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडा

शिमला/नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशच्या धरमशाला विधानसभा संकुलाच्या मुख्य गेटवर खलिस्तानचे झेंडे लावण्यात आल्याचे आणि भिंतींवर आक्षेपार्ह घोषणा लिहिलेल्या

ओल्गा तोकार्कझूक व पीटर हांदके यांना साहित्याचा नोबेल
शैक्षणिक स्वातंत्र्य लोकशाहीचे अविभाज्य अंग
आघाडी सरकारसाठी हालचाली सुरु

शिमला/नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशच्या धरमशाला विधानसभा संकुलाच्या मुख्य गेटवर खलिस्तानचे झेंडे लावण्यात आल्याचे आणि भिंतींवर आक्षेपार्ह घोषणा लिहिलेल्या आढळल्याने पोलिसांनी रविवारी शिख फॉर जस्टिस संघटनेचे नेते गुरपतवंत सिंग पन्नू याला अटक केली. त्याच्या विरोधात बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा (UAPA) आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हिमाचल विधानसभेचे हिवाळी अधिवेशन धरमशाला येथे हॉट असते. तेथे विधानसभा संकुलाच्या मुख्य गेट क्रमांक एकच्या बाहेरील बाजूस हे झेंडे लटकलेले आढळून आले, ते प्रशासनाने हटवले आहेत.

कांगरा पोलिस अधीक्षक खुशाल शर्मा म्हणाले, ‘ही घटना ८ मे रोजी रात्री उशिरा किंवा पहाटे घडली असावी. आम्ही विधानसभेच्या गेटवरून खलिस्तानी झेंडे हटवले आहेत. आम्ही तपास करत आहोत.”

हिमाचल प्रदेश आणि शेजारील राज्यांच्या काही भागांमध्ये खलिस्तान समर्थक कारवायांच्या पार्श्वभूमीवर आणि ६ जून हा खलिस्तान सार्वमत दिवस असल्याने, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील सीमा तसेच संवेदनशील भाग “सील” केले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी सांगितले की, मुख्य आरोपी पन्नूविरुद्ध यूएपीएचे कलम १३ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५३ ए आणि १५३ बी याशिवाय हिमाचल प्रदेश सार्वजनिक ठिकाणे (विकृती प्रतिबंध) कायद्याचे कलम 3, 1985. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कुंडू यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की कांगडा जिल्ह्यातील धरमशाला तहसील अंतर्गत कानेड गावातील राम चंद उर्फ ​​अजय कुमार यांच्या तक्रारीवरून पन्नू आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

धरमशाला येथील तपोवनमध्ये येथील हिमाचल विधानसभा संकुलाच्या मुख्य गेटजवळील बाहेरील भिंतींवर खलिस्तानचे झेंडे आणि खलिस्तान समर्थक घोषणांच्या उपस्थितीशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी सात सदस्यीय विशेष (एसआयटी) तपास पथकाची स्थापना केली आहे.

एनडीटीव्हीने एका वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की २६ एप्रिल रोजी गुप्तचर सूचना जारी करण्यात आली होती, ज्यात दावा केला होता की प्रतिबंधित शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी मुख्यमंत्र्यांना अशा घटनेचा इशारा दिला होता.

वृत्तानुसार, सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिमल्यात भिंद्रनवाले आणि खलिस्तानचा झेंडा फडकवला जाईल, असे म्हटले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0