कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील घाट भागातील काह

महाराष्ट्राला पुनर्निर्माण, नवनिर्माणाची गरज
चलीये बात करते है!
बाजार समित्यांची बरखास्ती; नुकसानीचा अंदाज नाही..

मुंबई: कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील घाट भागातील काही ठिकाणी २२ ते २५ जून दरम्यान पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

२२ जून रोजी मराठवाड्यात वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुण्यातील घाट भागातील काही ठिकाणी २३ ते २५ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र- गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर २२ जूनच्या मध्यारात्रीपर्यंत ३-३.१ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0