७ वर्षांतला निचांक, जीडीपी ४.७

७ वर्षांतला निचांक, जीडीपी ४.७

नवी दिल्ली : ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीतील जीडीपी ४.७ टक्के असल्याची माहिती शुक्रवारी राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने जाहीर केली. जीडीपीची ही टक्क

देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्के
२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण
चालू आर्थिक वर्षांत जीडीपीत ९.५ टक्के घसरण

नवी दिल्ली : ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीतील जीडीपी ४.७ टक्के असल्याची माहिती शुक्रवारी राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने जाहीर केली. जीडीपीची ही टक्केवारी गेल्या ७ वर्षांतील सर्वात निचांकी आहे. याच काळात २०१८-१९मध्ये जीडीपी ५.६ टक्के होता तर जानेवारी ते मार्च २०१२-१३ काळात जीडीपी ४.३ टक्के होता.

सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर २०१९चा जीडीपी ५.१ इतका जाईल असा अंदाज केला होता.

जीडीपीची झालेली घसरण मॅन्युफॅक्युचरिंग क्षेत्रातील विकासदर खालावल्यामुळे आहे. गेल्या वर्षी याच काळात मॅन्युफॅक्युचरिंग क्षेत्राची वाढ ५.२ टक्के होती ती या तिमाहीत ती ०.२ टक्क्याने घसरली आहे. पण कृषी क्षेत्राची गेल्या वर्षी वाढ २ टक्के होती ती या तिमाहीत ३.५ टक्के इतकी वाढली आहे.

बांधकाम क्षेत्रात गेल्या वर्षी याच तिमाहीतील टक्केवारी ६.६ टक्के होती ती  वाढ ०.३ टक्क्याने घसरली तर खाण क्षेत्रातील टक्केवारी ४.४ वरून ३.२ इतकी घसरली आहे. वीज, नैसर्गिक वायू, जलपुरवठा व अन्य सोयींमध्येही ०.७ टक्क्याने घसरण झाली आहे. तर व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण व सेवाक्षेत्रातील वाढ ७.८ टक्क्याहून ५.९ टक्क्यावर घसरली आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०१८मध्ये जीडीपी ६.३ टक्के होता तो एप्रिल ते डिसेंबर २०१९मध्ये ५.१ टक्के इतका खाली आला आहे.

२०१९-२०च्या किंमती नुसार दरडोई उत्पन्न १,३४,४३२ रु. अंदाजित असून ते २०१८-१९च्या तुलनेत ६.३ टक्क्यांनी वाढ दाखवत आहे. त्यावर्षी दरडोई उत्पन्न १,२६,५२१ रु. होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0