वर्धा : देशभर लॉकडाउन पुकारला असताना जिल्ह्यातील भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्याच्या केलेल्या वाटपात सुमारे २०० हून अधिक नागरिक जमा झाले होते. केचे यांच्या या वर्तनाने सामाजिक अंतर ठेवण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाले.
खुद्द केचे यांनी आपण वाढदिवसाला अन्नवाटप करणार असल्याचे जाहीर करून लोकांना बोलावले नसल्याचा दावा केला. पण सब डिव्हिजनल ऑफिसर हरीश धार्मिक यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून केचे यांच्यावर महासाथ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. केचे यांनी प्रशासनाकडून अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केचे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे, ते म्हणाले, कोरोना संकटामुळे रोजगार गेलेल्या २१ मजूरांना मी घरी बोलावले होते व त्यांना अन्नवाटप केले होते. पण नंतर सकाळी ११ वाजता गुरु भिकाराम बाबा यांना भेटायला गेलो होतो. पण या दरम्यान माझ्या काही राजकीय विरोधकांनी या परिस्थितीचा फायदा घेत माझ्या घराबाहेर गरीबांना अन्नवाटप केले जात असल्याची अफवा पसरवली. या अफवेमुळे माझ्या घराबाहेर लोकांचा जमाव जमा होत गेला. नंतर मला जेव्हा ही घटना लक्षात आली तेव्हा मी पोलिसांना कळवले. पोलिसांनी लोकांना तेथून हटवल्यानंतर मी घरी आलो. सध्याच्या घडीला सामाजिक अंतर पाळायचे आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले देशव्यापी आवाहनही मला पूर्ण माहिती आहे. पण माझ्या विरोधकांनी माझी प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हे सगळे घडवून आणले.
पण केचे यांनी आपल्या स्पष्टीकरणात एकाही विरोधकाचे नाव घेतले नाही.
वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केचे यांच्या अशा कोणत्याही कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी दिली नव्हती व केचे यांनी परवानगीही मागितली नव्हती असे म्हटले आहे. केचे यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करणार असल्याची इच्छा प्रदर्शित केली होती पण प्रशासनाने ती नाकारली होती. पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पाच जणांकडून रक्तदान करण्यात आले होते. केचे यांना माहिती कळताच ते धावत घरी आले आणि त्यांनी जमावाला पांगवले.
या संदर्भात जिल्हापोलिस प्रमुख बसवराज तेली यांनी असे सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी केचे घरातच उपस्थित होते आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ बातमी
COMMENTS