उ. प्रदेश हिंसाचार : अनुराग, स्वराकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

उ. प्रदेश हिंसाचार : अनुराग, स्वराकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या हिंसाचाराला आपले समर्थन नाही पण उ. प्रदेशात ज्या पद्धतीने सामान्य नागरिकाचे

अनुराग ‘डिसेंट’ कश्यप
४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : बिहारमध्ये याचिका
बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या हिंसाचाराला आपले समर्थन नाही पण उ. प्रदेशात ज्या पद्धतीने सामान्य नागरिकाचे मूलभूत घटनात्मक हक्क डावलून त्यांच्यावर पोलिसांनी अमानुषपणे कारवाई केली व तिथे हिंसाचार झाला त्याची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अपर्णा सेन, स्वरा भास्कर यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनी केली आहे. हे पत्र या कलावंतांनी न्यायालयांना पाठवले असून उ. प्रदेशातील हिंसाचाराबाबत, तेथील मालमत्तांच्या हानीची न्यायालयाने चौकशी करावी अशी मागणी आपल्या पत्रात केली आहे.

स्वरा भास्कर, झीशान अय्युब

स्वरा भास्कर, झीशान अय्युब

या पत्रात उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ यांची भावना भडकावणारी विधाने, कायद्याची कक्षा ओलांडून शाब्दिक खेळ करणारे त्यांचे संदेश याचा फायदा घेत उ. प्रदेश पोलिसांनी शांततेत निदर्शने करणाऱ्या जनतेवर अमानुषपणे वर्तन केले, ठराविक समाजाच्या मालमत्तेची नासधूस केली. पोलिस आपल्या कारवाईत अल्पसंख्याक समुदायाविरोधात विद्वेषाची भाषा वापरताना दिसत होते. त्यांची भाषा भावना भडकावणारीही होती. पोलिसांनी राज्याच्या अनेक भागात इंटरनेट बंद करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचाही भंग केला, असे मुद्दे मांडले आहेत.

या पत्रावर विक्रमादित्य मोटवाने, अलंक्रिता श्रीवास्तव, कुब्रा सैत, मलैका दुआ, कोंकणा सेन-शर्मा, झीशान अय्युब, स्वरा भास्कर यांच्यासह अन्य कलावंतांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या पत्रावर बॉलीवूडमधील आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान यांच्या स्वाक्षऱ्या का नाहीत असा प्रश्न विचारला असता झीशान अय्युब यांनी हा प्रश्न महत्त्वाचा नसून लाखो लोक रस्त्यावर येऊन सरकारविरोधात उभे राहिले होते. बॉलीवूड हे महत्त्वाचे नाही. या देशापुढे अनेक मोठे प्रश्न असून कोण काय बोलले, कोण बोलले नाही हे प्रश्न महत्त्वाचे नसल्याचे सांगितले.

तर स्वरा भास्कर यांनी बॉलीवूडकड़ून देश चालवला जात नाही, असे उत्तर दिले.

दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उ. पोलिसांच्या कारवाईची न्यायालयीन चौकशी होईल का असा सवाल केला आहे. उ. प्रदेश पोलिसांकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जात आहे व हे सर्व टीव्हीवर पाहून प्रचंड नैराश्य आले आहे. लोकांच्या घरात घुसणे, सीसीटीव्ही फोडणे, लोकांच्या मालमत्तांचे मोठे नुकसान करणे योग्य आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0