ममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार

ममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार

कोलकाताः प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रोम दौऱ्याला परराष्ट्र खात्याने मंजुरी देण्यास नकार दिला. रोमच्या व्हॅटिकन सिटी येथे पुढील महिन

सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा
भारतातील मंदी: उबर, अंतर्वस्त्रे आणि आजाराची इतर चिन्हे
४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसरा डोसला प्राधान्य

कोलकाताः प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रोम दौऱ्याला परराष्ट्र खात्याने मंजुरी देण्यास नकार दिला. रोमच्या व्हॅटिकन सिटी येथे पुढील महिन्यात ६ व ७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेचे (वर्ल्ड पीस कॉन्फरन्स) आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी भारतातून ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण इटलीच्या सरकारने ममता बॅनर्जी यांना पाठवले असून हे निमंत्रण मिळवणार्या त्या देशातल्या एकमेव आहेत. पण या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेला एखाद्या मुख्यमंत्र्याने उपस्थित राहावे एवढी ती महत्त्वाची नाही व तिचा तेवढा दर्जाही नाही, असे परराष्ट्र खात्याचे स्पष्ट करत ममता बॅनर्जींना रोम जाण्यास परवानगी नाकारली.

केंद्राच्या या निर्णयावर नाराजी प्रकट करत ममता बॅनर्जी यांनी आपण शिष्टाचार म्हणून परराष्ट्र खात्याकडे परवानगी मागितली होती. अशा अनेक परदेशी कार्यक्रमांना अनेक मुख्यमंत्री केंद्राकडून परवानगीसुद्धा मागत नाहीत. पण आपण देशाच्या परराष्ट्र धोरणाचा मान ठेवून केंद्राकडे परवानगी मागण्याचा निर्णय घेतला होता. या परिषदेला एक मुस्लिम धर्मगुरू व ख्रिश्चन धर्माचे प्रचारकांना आमंत्रण देण्यात आले आहे व आपण एकमेव व्यक्ती आहे की जी हिंदू धर्माची आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या.

आपला मानवतेवर दृढ विश्वास आहे. जर या परिषदेला जाण्याची केंद्राने परवानगी दिली असती त्या परिषदेच्या व्यासपीठावरून भारतामध्ये सर्व धर्माचे नागरिक शांतता व सद्भभावात राहात असल्याचे आपण सांगितले असते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. म. गांधी, नेहरु, बोस, पटेल या नेत्यांच्या गौरवशाली कारकिर्दीची आपण तेथे चर्चा केली असती. पण केंद्राला आपण तेथे काही करू नये असे वाट आहे. हे सरकार आपल्याला किती वेळा रोखणार असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने या आधी ममता बॅनर्जी यांच्या चीन भेटीलाही परवानगी दिली नव्हती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0