निवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार

निवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार

लखनौ/ चंडीगढ़:  उ. प्रदेश सरकार मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात आला. त्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यां

मंत्रिमंडळात फेरबदल; मात्र चांगल्या प्रशासनाची ग्वाही नाहीच!
अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ
योगी सरकारमध्ये ब्राह्मण व ओबींसीना प्रतिनिधित्व

लखनौ/ चंडीगढ़:  उ. प्रदेश सरकार मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात आला. त्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांच्यासह ७ जणांना मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी जितीन प्रसाद, पलटू राम, धर्मवीर सिंह, छत्रपाल सिंह गंगवार, संगीता बलवंत, संजीव कुमार गौड व दिनेश खटिक यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

जितीन प्रसाद यांना कॅबिनेट दर्जाचे तर अन्य जणांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आदित्यनाथ सरकारने मंत्रिमंडळात फेरफार केले आहेत. जितीन प्रसाद यांच्या माध्यमातून एक ब्राह्मण चेहरा आदित्य नाथ सरकारने पुढे आणला आहे. पण जितीन प्रसाद हे २०१४ व २०१९ची लोकसभा निवडणूक हारले आहेत. तसेच गेली विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारामुळे उ. प्रदेश सरकारमध्ये नियमानुसार ६० मंत्र्यांच्या जागा भरल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांसमवेत २४ कॅबिनेट मंत्री आहेत.

पंजाबात काँग्रेस सरकारमध्ये १५ जणांना मंत्रिपदाची शपथ

रविवारी पंजाबमधील काँग्रेस सरकारमध्ये १५ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात ५ नव्या चेहर्यांना संधी दिली गेली तर ६ जणांना कॅबिनेट दर्जाचे पद देण्यात आले. पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर हे नवे बदल आणले आहेत. कॅबिनेटमध्ये असलेले सर्व ६ जण नवे आहेत. तर अन्य ९ मंत्री गेल्या अमरिंदर सिंह सरकारमध्ये सामील होते. नव्या सरकारमध्ये सामील झालेले राणा गुरजित सिंह यांच्या नावाला काही काँग्रेस आमदारांचा विरोध होता. हा विरोध या आमदारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना पत्राद्वारे पाठवला होता. राणा गुरुजित सिंह यांच्या ऐवजी अन्य अनु. जातीच्या आमदाराला संधी द्यावी असे या आमदारांचे म्हणणे होते. राणा गुरजित सिंह यांना अमरिंदर सरकारमध्ये असताना खाण उद्योगात भ्रष्टाचार केल्याचा आरोपावरून राजीनामा दिला होता. गुरुजित सिंह हे श्रीमंत मंत्री म्हणून पंजाबात ओळखले जातात.

या मंत्रिमंडळ विस्तारात सिद्धू यांचे नजीकचे कुलजित कालरा यांना मात्र संधी देण्यात आली नाही.

शपथ घेतलेल्या मंत्र्याची नावे पुढील प्रमाणेः ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीत सिंह बादल, तृप्त राजिंदर सिंह बाजवा, अरुणा चौधरी, सुखबिंदर सिंह सरकारिया, राणा गुरजीत सिंह, रजिया सुल्ताना, विजय इंदर सिंगला, भारत भूषण आशु, रणदीप सिंह नाभा, राजकुमार वेरका, संगत सिंह गिलजियां, परगट सिंह, अमरिंदर सिंह राजा वडिंग, गुरकीरत सिंह कोटली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0