हिंदु-मुस्लिम वाद विसरुन मुझफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकवटले

हिंदु-मुस्लिम वाद विसरुन मुझफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकवटले

सप्टेंबर २०१३मध्ये उ. प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल उसळली होती. या भागात प्रभावशाली जाट समाज व मुस्लिम समुदाय अनेक दशके एकत्र राहात अस

राहुल गांधी : प्रतिमा आणि वास्तव
सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला
‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण, देशभर जल्लोष

सप्टेंबर २०१३मध्ये उ. प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल उसळली होती. या भागात प्रभावशाली जाट समाज व मुस्लिम समुदाय अनेक दशके एकत्र राहात असतानाही दंगल अनेक दिवस धगधगत होती.

‘किसान महापंचायत’ मुझफ्फरनगर. छायाचित्र - इस्मात आरा.

‘किसान महापंचायत’ मुझफ्फरनगर. छायाचित्र – इस्मात आरा.

हा भाग प्रामुख्याने ऊस उत्पादकाचा पट्टा समजला जातो. शेतीवरच सगळे अवलंबून असल्याने दोन्ही समुदायामध्ये तसा एकोपाच दिसत होता. पण त्याला छेद देणारी २०१३मध्ये दंगल उसळली. या दंगलीत प्रमुख जाट समुदाय व अन्य जाती मुस्लिमांविरोधात एकवटल्या आणि मुझफ्फरनगरच्या हिंदु-मुस्लिम एकोप्याच्या इतिहासात काळ्याकुट्ट घटनांची नोंद झाली.

या दंगलीत अल्पसंख्याक मुस्लिम समुदायातील अनेक कुटुंबांनी आपले संसार अर्ध्यावर सोडून पलायन केले. या घटनांनी प. उत्तर प्रदेशातील राजकारणाला धर्मांध वळण लागले. प्रदेशातील शेतीच्या मूलभूत समस्या मागे पडल्या आणि हिंदु-मुस्लिम संघर्ष असा नवा प्रश्न राजकीय पटलावर आकार घेऊ लागला.

‘किसान महापंचायत’ मुझफ्फरनगर. छायाचित्र - इस्मात आरा.

‘किसान महापंचायत’ मुझफ्फरनगर. छायाचित्र – इस्मात आरा.

ही धर्मांध दरी बुजायला ८ वर्षे लागली असे रविवारच्या घटनेवरून लक्षात येते. रविवारी मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याला विरोध दाखवण्यासाठी पश्चिम उ. प्रदेशातील लाखो हिंदु-मुस्लिम शेतकरी जमले होते. मुझफ्फरनगरच्या इतिहासात लाखोच्या संख्येने जमलेली ही आगळीवेगळी ‘किसान महापंचायत’ होती. कोरोना महासाथीच्या काळातही लाखोने शेतकरी जमणे ही उ. प्रदेशाच्या राजकारणातील महत्त्वाची घटना समजली पाहिजे.

१९८०चे दशक व १९९० दशकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत शेतकरी आंदोलनाने उ. प्रदेशात बर्याच राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. सत्तेतील सरकारे हादरून गेली होती. आता तशा हालचाली दिसू लागल्या आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलने आकारास आली आहेत व त्याचा मोठा प्रभाव रविवारच्या महापंचायतीत दिसून आला.

महत्त्वाची बाब म्हणजे लाखोच्या संख्येने हिंदु-मुस्लिम शेतकरी आपले धर्म, जाती विसरून वादग्रस्त शेती कायद्याच्या विरोधात उभे राहाताना दिसले. आपली जमीन कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात जाणार, दुरावस्थेत असलेली शेती वेगाने उध्वस्त होत जाणार या प्रश्नाने अस्वस्थ झालेले लाखो शेतकरी या आंदोलनात सामील झाले होते.

‘किसान महापंचायत’ मुझफ्फरनगर. छायाचित्र - इस्मात आरा.

‘किसान महापंचायत’ मुझफ्फरनगर. छायाचित्र – इस्मात आरा.

पुढील वर्षी उ. प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर जमीन, शेती समस्या व नवे कृषी कायदे याने उ. प्रदेशमधील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून जाणार हे निश्चित आहे.

महत्त्वाचा भाग असा की ८ वर्षांपूर्वीच्या मुझफ्फरनगरमधल्या धार्मिक दंगलीचा फायदा भाजपने लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत उठवला होता. आज वादग्रस्त शेती कायद्यामुळे त्याच भाजपच्या विरोधात हिंदु-मुस्लिम समुदाय एकत्र आलेले दिसून येत आहेत.

या महापंचायतीमुळे हिंदु-मुस्लिम तणाव निवळला आहे असेही म्हणता येणार नाही पण या परिसरातील शेतकर्यांना धार्मिक प्रश्नापेक्षा त्यांच्या शेती व आर्थिक प्रश्नांविषयी जागरुकता आलेली दिसत आहे हे महत्त्वाचे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0