‘इस्लाम खतरे मै हैं’च्या प्रचारात फसू नयेः भागवत

‘इस्लाम खतरे मै हैं’च्या प्रचारात फसू नयेः भागवत

गाजियाबादः सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे इस्लाम खतरे मैं है, या प्रचारात मुसलमानांनी फसू नये. देशात एकता आल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. एकते

७ महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सोशल मीडिया बंदी मागे
लुटेन्सच्या दिल्लीचे रूप पालटणार
सार्वजनिक क्षेत्र, कार्यक्षमता व डाव्यांची युनियन वगैरे

गाजियाबादः सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे इस्लाम खतरे मैं है, या प्रचारात मुसलमानांनी फसू नये. देशात एकता आल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आहे, आपण पूर्वजांचा गौरव केला पाहिजे. हिंदु-मुस्लिम संघर्षावर केवळ संवाद हाच मार्ग असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले. ते राष्ट्रीय मुस्लिम मंचने आयोजित केलेल्या ‘हिंदुस्तानी प्रथम, हिंदुस्तान प्रथम’ या कार्यक्रमात बोलत होते. या मंचातर्फे डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांच्या ‘वैचारिक समन्वय-एक पहल’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद हे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार होते.

भागवत यांनी ईश्वराच्या पूजनावरून भेदाभेद करण्यावरही आक्षेप घेतला.

आपण धर्मातील पूजनाबाबत असे करू शकत नाही, असे म्हणत भागवत यांनी झुंडशाहीसंदर्भात काही जणांवर बनावट आरोप दाखल केल्याचा दावा केला. झुंडशाही हिंदुत्वाला मान्य नाही. या देशात हिंदु किंवा मुस्लिम या पैकी एकाचे प्रभुत्व होऊ शकत नाही. मात्र भारतीयांचे प्रभुत्व होऊ शकते. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा भ्रामक आहे कारण ते वेगवेगळे नाही, सर्व भारतीयांचा तो कोणत्याही धर्माचा असेना त्याचा डीएनए एकच आहे, असे ते म्हणाले.

भागवतांनी भाषा, प्रदेश, विषमता यांना मूठमाती देऊन एक होण्याची गरज व्यक्त केली. तसे केल्यास भारत विश्वगुरु होऊन जग सुरक्षित होईल, असे ते म्हणाले.

भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रवादासाठी काम करतो, असे स्पष्ट करत संघाचे स्वयंसेवक राजकीय काम करत नाहीत. राजकारण हे तोडण्यासाठी असते संघ जोडण्याचे काम करत करतो. संघ निवडणुकीत आपली ताकद लावतो पण त्या मागे केवळ देशहिताचा भाग असतो, असा दावा केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0