जनतेची दिशाभूल करू नयेः रामदेवबाबांना हायकोर्टाकडून समज

जनतेची दिशाभूल करू नयेः रामदेवबाबांना हायकोर्टाकडून समज

नवी दिल्लीः अॅलोपथीच्या विरोधात विधाने करून त्याच्या दुष्प्रचार करू नये व जनतेची दिशाभूलही करू नये. कोरोनील औषधासंबंधात अधिक काही बोलू नये, अशी समज बु

रामदेव बाबा यांची दुसऱ्यांदा बनवाबनवी
‘पतंजली’ला प्राप्तीकर खात्याकडून करसवलत
‘संभ्रम करणारा कोरोना विषाणूचा फोटो त्वरित हटवावा’

नवी दिल्लीः अॅलोपथीच्या विरोधात विधाने करून त्याच्या दुष्प्रचार करू नये व जनतेची दिशाभूलही करू नये. कोरोनील औषधासंबंधात अधिक काही बोलू नये, अशी समज बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांना दिली. आपले असंख्य अनुयायी आहेत व त्यांचा आपल्या कोणत्याही विधानांवर विश्वास बसत असतो पण आपण मोठ्या प्रमाणावर अधिकारवाणीने अधिक बोलून जनतेची दिशाभूल करू नये, असे न्या. अनुप जे भंभानी यांनी रामदेव बाबा यांना सांगितले.

कोविड-१९ महासाथीत पतंजली आयुर्वेद कंपनीने आपले कोरोनील औषध बाजारात आणले होते व हे औषध कोरोनावर गुणकारी असल्याचा दावाही करण्यात आला होता. बाबा रामदेव यांनी कोरोना महासाथ पसरण्यामागे अॅलोपथीला जबाबदार धरले होते. यावर देशातल्या अनेक विद्वान डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता व डॉक्टरांच्या विविध संघटनांनी रामदेव बाबा यांच्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. या याचिकांमध्ये बाबा रामदेव अॅलोपथीच्या विरोधात दुष्प्रचार करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

बुधवारी या खटल्यावर सुनावणीदरम्यान डॉक्टरांचे वकील अखिल सिब्बल यांनी कोरोनील हे कोविड-१९ वरचे गुणकारी औषध असल्याचा दावा करण्यात आला होता पण या औषधाला कोणतीही परवानगी नसल्याचे न्यायालयाला सांगितले. रामदेव बाबा यांनी सरकारच्या लसीकरण मोहिमेवरही टीका करत लसीकरणामुळे कोविड-१९ला आळा बसणार नाही, कोरोना थांबवायचा असेल तर आयुर्वेद व योग शिवाय पर्याय नाही अशी विधाने केल्याचे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर न्या. भंभानी यांनी आपल्यापुढील खरी चिंता सार्वजनिक असल्याचे सांगितले. आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती व तिची प्रतिष्ठा आपल्याला कलंकित करायची नाही. ही चिकित्सा प्राचीन भारतीय आरोग्य चिकित्सा आहे पण अॅलोपथीच्या विरोधात दिशाभूल करणारी विधाने करू नये, असे आपल्याला वाटते. ही चिकित्सा मान्यता प्राप्त आहे हेही आपल्याला विसरता कामा नये, असे न्या. भंभानी म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: