तरुणीने दिल्या पाकिस्तान-हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा

तरुणीने दिल्या पाकिस्तान-हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा

बंगळुरू : शहरात एनआरसी व वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी वेगळे वळण लागले. अमुल्या लियोना या २० वर्षा

बंगळुरू दंगलः एसडीपीआय संघटनेची चौकशी सुरू
छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा विधानसभेत निषेध
श्री श्री रवीशंकर यांना विरोध

बंगळुरू : शहरात एनआरसी व वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी वेगळे वळण लागले. अमुल्या लियोना या २० वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीने थेट मंचावर जाऊन पाकिस्तान झिंदाबाद व हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने खळबळ माजली. आयोजकांनी अमुल्याला सावरण्याचा प्रयत्न केला, तिच्या हातातला माईकही काढून घेतला पण ती कुणाच्या ऐकण्याच्या तयारीत नव्हती. अखेर पोलिस मंचावर आले आणि त्यांनी तिला अटक केली.

अमुल्या लियोना ही पूर्वी बंगळुरूतील सीएएच्या विरोधात अनेक आंदोलनामध्ये सामील झालेली आहे. गुरुवारी तिला सीएएविरोधातील कार्यक्रमात बोलावले होते. त्यावेळी रंगमंचावर ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम)चे अध्यक्ष व लोकसभा खासदार असाउद्दीन ओवेसी उपस्थित होते.

अमुल्याने भाषणास सुरूवात करताना तिने दोन वेळा पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मंचावर एकदमच खळबळ माजली व खुद्ध ओवेसी तिच्या बाजूला धावले व त्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी अमुल्याच्या हातातला माईक हिसकावला त्यावेळी तिने हिंदुस्थान झिंदाबादच्या पाच वेळा घोषणा दिल्या. ती आपण या घोषणा का देत आहोत, याबाबतची आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती पण मंचावरील कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी तिला रोखले. नंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या कारणावरून अमुल्यावर आयपीसी अंतर्गत १२२ (अ) व १५३ (अ)(ब) गुन्हे दाखल करून तिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

दरम्यान अमुल्याच्या या वर्तनावर तिचे वडील नाराज असून त्यांनी अमुल्याने जे काही वक्तव्य केले आहे, त्याच्याशी मी सहमत नाही, ती अनेक मुस्लिमांशी जोडलेली आहे व ती आमचे काही ऐकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तर असाउद्दीन ओवेसी यांनी या महिलेशी आपण सहमत नसून तिचा माझा व माझ्या पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आयोजकांनी तिला का बोलावली, तिला बोलावण्याची गरज नव्हती असेही ते म्हणाले.

अमुल्या कोण आहे?

केवळ २० वर्षांची अमुल्याने पत्रकारितेचे शिक्षण घेत असून ती ब्लॉगरही आहे. सीएएच्या विरोधात तिने अनेक वेळा फेसबुकवर आपली मते मांडली आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने भारताच्या शेजारील पाकिस्तान व अन्य देशांचे कौतुक करणारी ‘हिन्दुस्तान झिंदाबाद, पाकिस्तान झिंदाबाद, बांग्लादेश झिंदाबाद, श्रीलंका झिंदाबाद, नेपाल झिंदाबाद, अफगाणिस्तान झिंदाबाद, चीन झिंदाबाद, भूतान झिंदाबाद’ अशी कन्नड भाषेत पोस्ट लिहिली होती. माझे माझ्या देशावर प्रेम आहे व मी दुसऱ्या देशांचा आदर करते असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.

लिओनाच्या घराबाहेर भाजपचे कार्यकर्ते

गुरुवारी ही घटना झाल्यानंतर काही भाजप कार्यकर्ते अमुल्याच्या गुल्लागड्‌डे या भागात तिच्या घराबाहेर जमा झाले. काही कार्यकर्त्यांनी खिडक्या व दारांची नासधुसही केल्याचा आरोप अमुल्याच्या वडिलांनी-वाझी- यांनी केला. आपण काही कार्यकर्त्यांना ओळखतो व त्यांची नावे पोलिसांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले. वाझी यांनी यापूर्वी भाजप पक्षासाठी काम केले आहे. पण माझ्या मुलीने जे काही कृत्य केले आहे त्यासाठी मी न्यायालयात जाऊन जामीन मागणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

अमूल्याच्या वर्तनावर तिला देशद्रोह खटला लावला आहे पण यापूर्वी श्री श्री रवीशंकर यांनीही २०१६मध्ये जागतिक सांस्कृतिक सोहळ्यात ज्यामध्ये पाकिस्तानमधील एक धार्मिक नेते मुफ्ती मौलाना मोहम्मद सईद खान यांना आमंत्रित केले होते, त्यांच्या हातात हात घालत ‘जय हिंद और पाकिस्तान झिंदाबाद साथ साथ चलें,’ असा नारा दिला होता. या संदर्भातील व्हिडिओही स्क्रोलवर दिसत आहे. या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग उपस्थित होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0