श्री श्री रवीशंकर यांना विरोध

श्री श्री रवीशंकर यांना विरोध

नवी दिल्ली : बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी)तील काही विद्यार्थी गटांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांच्या

बंगळुरुः वादग्रस्त फेसबुक पोस्टने दंगल, ३ ठार
बंगळुरू दंगलः एसडीपीआय संघटनेची चौकशी सुरू
बंगळुरात ३ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा पत्ता खोटा

नवी दिल्ली : बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी)तील काही विद्यार्थी गटांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांच्या संस्थेतील प्रस्तावित कार्यक्रमाविरोधात निषेधाची भूमिका घेतली आहे. श्री श्री रवीशंकर यांची अनेक मते अशास्त्रीय असतात, अशा मतांना संस्थेकडून महत्त्व दिले जाऊ नये असे या विद्यार्थ्यांचे मत आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाने श्री श्री रवीशंकर यांच्या मतापासून स्वत:ला दूर ठेवावे असाही आग्रह या विद्यार्थी गटांचा आहे.

श्री श्री रवीशंकर यांच्या कार्यक्रमाला गेले आठवडा हा विरोध सुरू आहे. आयआयएससीमध्ये सुमारे चार हजार विद्यार्थी असून विद्यार्थी गटांनी एक याचिका तयार करून त्यावर स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद, संशोधकही सामील झाले आहेत.

या याचिकेत श्री श्री रवीशंकर यांनी मानसिक स्थिती, त्यांचे अवैज्ञानिक दावे यांचा समाचार घेण्यात आला आहे.

डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार या याचिकेवर सुमारे ७०० स्वाक्षऱ्या झाल्या असून ही याचिका लवकरच संस्थेचे प्राचार्य अनुराग कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

या याचिकेवर आपली प्रतिक्रिया देताना श्री श्री रवीशंकर यांनी आपल्याला होणारा विरोध हा पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही भूमिकेबाबत पूर्वग्रह ठेवू नयेत अशी विज्ञानाची परिभाषा आहे व विज्ञान तसे शिकवते. आपण तेही नाकारत असाल तर स्वत:ला वैज्ञानिक म्हणवून घेऊ नका असा प्रतिवाद रवीशंकर यांनी केला आहे.

रवीशंकर यांची अनेक मते पूर्वी वादग्रस्त ठरली होती. २०१७मध्ये जेएनयू विद्यापीठात त्यांनी समलैंगिकता ही प्रवृत्ती असते ती कायम नसते असे विधान केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0