हिंदुत्व गटाच्या तक्रारीनंतर मुनव्वर फारुकीचा बेंगळुरूमधील शो रद्द

हिंदुत्व गटाच्या तक्रारीनंतर मुनव्वर फारुकीचा बेंगळुरूमधील शो रद्द

'जय श्री राम सेना' नावाच्या संघटनेने असा आरोप केला आहे, की स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये भगवान राम आणि देवी सीता यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला शनिवारी ‘डोंगरी टू नो व्हेअर’ आयोजित करण्यास पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे. शहरात आयोजन करण्यासाठी आयोजकांनी परवानगी न घेतल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘जय श्री राम सेना’ संघटनेने स्टँड-अप कॉमेडियन फारुकी आणि आयोजकांविरोधात बेंगळुरूचे पोलिस आयुक्त सीएच प्रताप रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. फारुकी यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये भगवान राम आणि देवी सीता यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप संघटनेने आपल्या तक्रारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये मुनव्वर फारुकीचा बंगळुरू शो रद्द करण्यात आला होता आणि त्यानंतर बंगळुरू पोलिसांकडून त्याच्यावर शो रद्द करण्यासाठी दबाव आणल्याबद्दल बरीच टीका झाली होती.

हैदराबाद शोसाठी धमक्याही आल्या होत्या

तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंग यांना शुक्रवारी (१९ ऑगस्ट) हैदराबादमध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले होते. ते फारुकीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. सिंग यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माधापूरमधील कार्यक्रमावर नुकसान करण्याची धमकी दिली होती.

फारुकीचा शो शनिवारी आयोजित करण्यात आला होता आणि कॉमेडियनने इंस्टाग्रामवर सांगितले होते की तो वेळापत्रकानुसार होईल.

हैदराबादमधील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह हे त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांसाठी ओळखले जातात. सत्ताधारी टीआरएसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री केटी रामाराव यांनी फारुकी यांना कथितपणे निमंत्रण दिल्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता.

मूळ वृत्त 

COMMENTS