ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे ७८ टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे ७८ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध १५ जिल्ह्यांमधील ६२ तालुक्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार गुरुवारी सरासरी सुमारे ७८ टक्

मोदी खोटे का बोलतात?
वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका ५ ऑक्टोबरला

मुंबई : राज्यातील विविध १५ जिल्ह्यांमधील ६२ तालुक्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार गुरुवारी सरासरी सुमारे ७८ टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची २९ जून २०२२ रोजी घोषणा केली होती. त्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात २३८ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- ३६, धुळे- ४१, जळगाव- २०, अहमदनगर- १३, पुणे- १७, सोलापूर- २५, सातारा- ७, सांगली- १, औरंगाबाद- १६, बीड- १३, परभणी- २, उस्मानाबाद- ९, जालना- २७, लातूर- ६, आणि बुलडाणा- ५. एकूण- २३८.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0