शिक्षक भरती घोटाळाः प. बंगालमध्ये मंत्र्याला ईडीकडून अटक

शिक्षक भरती घोटाळाः प. बंगालमध्ये मंत्र्याला ईडीकडून अटक

नवी दिल्लीः राज्यातल्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीने शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते व प. बंगालचे उद्योग व वाणिज्य मंत्री पार्थ चटर्जी य

‘काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही’
‘भारताला मदत करण्यात जगाला आलं अपयश’
आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सोमवारी

नवी दिल्लीः राज्यातल्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीने शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते व प. बंगालचे उद्योग व वाणिज्य मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक केली, त्यांच्या अटकेनंतर पार्थ चटर्जी यांचे निकटच्या सहाय्यक अर्पिता मुखर्जी यांनाही ईडीने शनिवारी अटक केली. अर्पिता चटर्जी यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात २० कोटी रु.ची रोख रक्कम सापडली होती. त्यांच्याकडे असलेला हा सर्व पैसा बेकायदा आर्थिक देवघेवीतून आला असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. अर्पिता यांच्या घरातून २० मोबाइल फोनही ईडीने जप्त केले आहेत. ईडीने शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी छापे मारले आहेत.

पार्थ चटर्जी राज्याचे शिक्षणमंत्री असताना शिक्षक भरती घोटाळा झाला होता. त्यांची चौकशी ईडीने सुरू केली होती. पण या चौकशीला ते सहाय्य करत नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे. शिक्षक भरती घोटाळ्यातून जमा झालेली २० कोटी रु.ची रक्कम अर्पिता याच्या घरात सापडल्याचे ईडीचे म्हणणे आहे. चटर्जी यांना सोमवारी ईडी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: