‘लाल सलाम’, ‘कॉम्रेड’ म्हटल्यास गुन्हा

‘लाल सलाम’, ‘कॉम्रेड’ म्हटल्यास गुन्हा

नवी दिल्ली : फेसबुकवर ‘लाल सलाम’ व ‘कॉम्रेड’ हे शब्द वापरल्याने आणि रशियन क्रांतीचे जनक व्लादिमीर लेनिन यांचा फोटो लावल्याने आसाममधील शेतकरी नेते बिट्

एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी
आसाममध्ये भाजीविक्रेत्याचा झुंडबळी
महागाईवर बोलणारे ‘शंकर-पार्वती’ही आसाम पोलिसांना खुपले

नवी दिल्ली : फेसबुकवर ‘लाल सलाम’ व ‘कॉम्रेड’ हे शब्द वापरल्याने आणि रशियन क्रांतीचे जनक व्लादिमीर लेनिन यांचा फोटो लावल्याने आसाममधील शेतकरी नेते बिट्टू सोनोवाल हे माओवादी होतात, असा ठपका ठेवणारे आरोपपत्र २९ मे रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केले आहे. या आरोपपत्रात सोनोवाल हे सीएए, एनआरसीच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले आसाममधील शेतकरी नेते अखिल गोगोई यांचे सहकारी असण्याबद्दलही तपास यंत्रणेने आक्षेप घेतले आहेत.

सोनोवाल यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर व्लादिमीर पुतीन यांचा फोटो प्रसिद्ध केला होता आणि त्या फोटो खाली ‘भांडवलदार जनतेला जो दोर विकतात तोच त्यांचा फास होईल’, असे वाक्य लिहिले होते.

सोनोवाल यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर व्लादिमीर पुतीन यांचा फोटो प्रसिद्ध केला होता आणि त्या फोटो खाली ‘भांडवलदार जनतेला जो दोर विकतात तोच त्यांचा फास होईल’, असे वाक्य लिहिले होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आसाममध्ये अनेक ठिकाणी सीएए व एनआरसीविरोधात निदर्शने, आंदोलने केली होती. या आंदोलनात सोनोवाल यांच्यासह गोगोई व अन्य दोन कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. त्यावरून जानेवारीच्या सुरुवातीस सोनोवाल, गोगोई व अन्य दोन कार्यकर्त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने यूएपीए कायद्यांतर्गत ताब्यात घेतले होते.

सोनोवाल यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर व्लादिमीर पुतीन यांचा फोटो प्रसिद्ध केला होता आणि त्या फोटो खाली ‘भांडवलदार जनतेला जो दोर विकतात तोच त्यांचा फास होईल’, असे वाक्य लिहिले होते. त्याच बरोबर सोनोवाल आपल्या अनेक मित्रांना ‘लाल सलाम’ व ‘कॉम्रेड’ म्हणून संबोधत होते, हा गुन्हा असल्याचा एनआयएचा दावा आहे व तशी नोंद त्यांनी आपल्या आरोपपत्रात केली आहे.

शेतकरी नेते अखिल गोगोई यांना गेल्या वर्षी १२ डिसेंबरला जोरहाट येथे अटक केली होती व त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. पण गोगोई यांना न्यायालयाने जामीन दिला होता तरीही पोलिसांनी नंतर गोगोई यांच्यावर अन्य गुन्हे दाखल करत त्यांना पोलिस कोठडीत ठेवले आहे.

अखिल गोगोई हे कृषक मुक्ती संग्राम समिती या संघटनेचे सल्लागार असून त्यांनी एनआयएने त्यांच्याविरोधात दाखल केलेले सर्व गुन्हे पूर्वीच अमान्य केले आहेत. हे गुन्हे राजकीय सूडबुद्धीतून दाखल केल्याचे गोगोई यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गोगोई यांना माओवादी ठरवण्याचा एनआयएचा प्रयत्न असून आजपर्यंत या तपास यंत्रणेला तसे कोणतेही सबळ पुरावे सापडलेले नाही अशी प्रतिक्रिया कृषक मुक्ती संग्राम समितीचे अध्यक्ष भास्को सैकिया यांनी दिली आहे. एनआयएने आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे मारले तेव्हा काही कार्यकर्त्यांच्या घरातून ‘अन इंट्रोडक्शन टू सोशॅलिझम’, ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ अशी पुस्तके एनआयएला सापडली. या पुस्तकांच्या शीर्षकांवरून गुन्हे दाखल करण्यात आले हा हास्यास्पद प्रकार असल्याचे सैकिया म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0