ट्विट प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक

ट्विट प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक

अहमदाबादः एका ट्विट प्रकरणी आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांना बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातून अटक

‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा
आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचार; ६ पोलिस ठार

अहमदाबादः एका ट्विट प्रकरणी आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांना बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातून अटक केली. मेवानी यांना नंतर अहमदाबाद येथे व त्यानंतर गुरुवारी सकाळी विमानाद्वारे आसाममध्ये नेण्यात आले.

मेवानी यांनी १८ एप्रिलला दोन समाजात तेढ निर्माण होईल असे ट्विट केल्याची तक्रार कोकराझार येथे पोलिसांत करण्यात आली होती. हे ट्विट नथुराम गोडसे संदर्भात होते. हे ट्विट नंतर मेवानी यांनी आपल्या अकाउंटवरून हटवलेही होते. मेवानी यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ व आयपीसी कलम १५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मेवानी यांना कोकराझार पोलिसांनी अटक केली असून त्यांना जामीन मिळवण्यासाठी त्यांचे वकील आनंद याज्ञिक आसाम उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

मेवानी हे वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार असून ते गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0