प. बंगाल-अम्फान वादळात ७२ जणांचे बळी

प. बंगाल-अम्फान वादळात ७२ जणांचे बळी

कोलकाता : प. बंगालमध्ये आलेल्या अम्फान या चक्रीवादळाने गेल्या दोन दिवसांत ७२ जणांचे प्राण घेतले व हजारो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बुधवार

दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालीदला अटक
काश्मिरी जनतेचे शांततापूर्ण असहकाराचे धोरण
‘द डिसायपल’ हा व्यक्तिनिष्ठ आणि भावनिकः चैतन्य ताम्हाणे

कोलकाता : प. बंगालमध्ये आलेल्या अम्फान या चक्रीवादळाने गेल्या दोन दिवसांत ७२ जणांचे प्राण घेतले व हजारो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास हे वादळ ताशी १९० किमी प्रति तास वेगाने प. बंगालमधील दीघा किनारपट्टी व बांगलादेशाच्या हटिया बेटांना येऊन थडकले. त्यानंतर प. बंगाल राज्याच्या अनेक भागात तुफान वृष्टी आली. यावेळी वादळाचा वेग १६०-१७० किमी प्रति तास इतके होता.

अम्फानमुळे आलेले संकट हे कोरोनापेक्षा भयंकर असल्याचा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोलकात्यामध्ये कोलकात्यामध्ये १५, हावडा येथे ७, उत्तर परगणा २४ जिल्ह्यात  १७, पूर्व मिदनापूरमध्ये ६, दक्षिण परगणा -२४ जिल्ह्यात १८, नादियामध्ये ६ आणि हुगळीमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्याचा दौरा करून वादळग्रस्त भागासाठी मदतीचे आवाहन केले होते. माझ्या आयुष्यात एवढे मोठे चक्रीवादळ पाहिले नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प. बंगाल व ओदिशाची हवाई पाहणी करतील असे ट्विट पीएमओने केले आहे. ते संबंधित अधिकार्यांशी चर्चाही करतील असे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने वादळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना २ ते अडीच लाख रु.ची मदत जाहीर केली असून राज्यातील उत्तर व दक्षिण २४ परगणा या दोन जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

हे दोन जिल्हे पुन्हा नव्याने उभे करण्याची गरज असून केंद्राने सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी प्रशासनातील अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारला केली आहे.

दरम्यान या दोन्ही जिल्ह्यांचा कोलकात्याशी असणारा संपर्क संपूर्णपणे विस्कळीत झाला आहे. मोबाईल व टेलिफोन यंत्रणांना मोठा तडाखा बसल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

कोलकात्याला तडाखा

या वादळाचा सर्वाधिक तडाखा राजधानी कोलकाताला व उत्तर-दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांना बसला. या वादळाने या भागात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले आहे. कोलकाता विमानतळावरही पाणी भरले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.

मध्य कोलकातातील अलिपूर भागात बुधवारी सकाळी २२२ मिमी पाऊस झाला तर दमदम भागात १९४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री नऊ नंतर पाऊस थांबला पण जोरदार वारे वाहात होते.

सुंदरवन त्रिभूज प्रदेशाचे तटबंदी उध्वस्त झाली असून दीघा व सुंदरबनमध्ये समुद्राच्या अजस्त्र लाटा दिसत होत्या.

ओदिशालाही या वादळाचा मोठा तडाखा बसला. बुधवारी व गुरुवारी एनडीआरएफच्या २० तुकड्या ओदिशात तैनात करण्यात आल्या तर १९ तुकड्या प. बंगालमध्ये आणण्यात आल्या.

या तुकड्यांच्या मदतीने प. बंगालमधील सुमारे ५ लाख तर ओदिशातील दीड लाखाहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ओदिशामधील पुरी, खुर्दा, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपाडा, जाजपूर, गंजम, भद्रक व बालासोर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0