निकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’

निकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’

नवी दिल्लीः १९९२च्या बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनो

बाबरी मशीद कारस्थानात मी नव्हतोः अडवाणी
बाबरी कटाचा अविश्वसनीय निकाल
बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा

नवी दिल्लीः १९९२च्या बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, नृत्यगोपाल दास, सतीश प्रधान यांच्यासह ३२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी जय श्रीराम असा नारा दिला. अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग ज्या न्यायालयांनी प्रशस्त केला त्या निर्णयांसारखा हा निकाल असल्याचीअडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली. हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. न्यायालयाचा निर्णय ऐकताच आम्ही जय श्रीरामचा नारा दिला असे अडवाणी यांनी व्हीडिओद्वारे सांगितले.

विशेष सीबीआय न्यायालयाकडून निकालाचे वाचन होत असताना अडवाणी आपल्या मुलीसोबत घरी होते. निकालपत्र वाचनादरम्यान, कन्या प्रतिभा यांनी अडवाणी यांचा हात आपल्या हातात घेतला होता.

बाबरी विध्वंस कटकारस्थान प्रकरणाती अन्य एक आरोपी व भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनीही न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला अशी प्रतिक्रिया दिली. हा विषय आता संपवला पाहिजे. सर्व देश भव्य राममंदिर निर्माण होण्यासाठी तयार असला पाहिजे. या क्षणाला जय जय श्रीराम, सबको सन्मती दे भगवान, असे एवढेच आपण म्हणू शकतो असे त्यांनी उत्तर दिले.

काँग्रेससह विरोधीपक्ष निर्णयावर नाराज

विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली. हा निर्णय गेल्या वर्षी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या विपरित आहे. राज्यघटना, सामाजिक सौहार्द व बंधुता या मुल्यांवर विश्वास ठेवणार्या सर्वसामान्य व्यक्तीला हा निकाल तर्कविसंगत वाटतो. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दार ठोठावणार असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. बाबरी मशीद पाडण्याचे षडयंत्र भाजप व संघपरिवारातील नेत्यांनी रचले होते हे सर्व देशाला माहिती आहे. या नेत्यांनीच देशातील सामाजिक सौहार्दावर हल्ला केला होता. यांनीच सर्वोच्च न्यायालयात खोटे शपथपत्र सादर केले होते. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडणे हा गुन्हा असल्याचे नमूद केले होते, याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी या निकालावर वही कातिल, वही मुंसिफ, अदालत उसकी, वो शहीद;’ अशी प्रतिक्रिया दिली. सीबीआय न्यायालयाचा हा निर्णय देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी सर्वात दुःखद दिवस आहे. आता न्यायालय हे कारस्थान नसल्याचे म्हणत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

विषय विसरून जाः संजय राऊत

विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशिदीचा विषय आता विसरला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. राममंदिर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी निर्णय दिल्यानंतर व पंतप्रधान मोदींनी राममंदिर भूमीपूजन केल्यानंतर या विषयाची प्रासंगिकता विशेष न्यायालयातही संपली होती. बाबरी मशीद पाडली नसती तर राम मंदिर उभे गेले नसते. हा विषय आता विसरला पाहिजे, असे ते म्हणाले.  

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0