बाबरी मशीद निकाल ९ महिन्यात हवा : सर्वोच्च न्यायालय

बाबरी मशीद निकाल ९ महिन्यात हवा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल येत्या नऊ महिन्यात लावावा असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयाला दिले. या प्

ओमर अब्दुल्ला यांची अटक व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग
पंजाब भाजप आमदाराला मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल
दोन खुराकांमधील विलंब; सरकारचा परस्पर निर्णय

नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल येत्या नऊ महिन्यात लावावा असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयाला दिले. या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती यांच्यासहित १२ जण आरोपी आहेत.

या खटल्यातील पुराव्यांची छाननी येत्या सहा महिन्यात व्हावी व त्यानंतर पुढील तीन महिन्यात निकाला द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. नरीमन व न्या. सूर्यकांत यांनी आदेश दिले. न्यायालयाने या प्रकरणाची जलद सुनावणी व्हावी म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल निकाल लागेपर्यंत वाढवावा असेही निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0