आज जन्माष्टमी; तुम्हाला कारागृहातून बाहेर यायचे की..?

आज जन्माष्टमी; तुम्हाला कारागृहातून बाहेर यायचे की..?

नवी दिल्लीः ‘तुम्हाला जामीन हवा की कारागृहवास? आज श्रीकृष्ण कारागृहात जन्माला आला. मग तुम्हाला आज कारागृहातून बाहेर यायचेय का?’ ११ ऑगस्टला कृष्ण जन

आंबेडकरांना राष्ट्रीय भाषा संस्कृत हवी होतीः बोबडे
सरन्यायाधीशही आता माहितीच्या अधिकार कक्षेत
गोवा समान नागरी कायद्याचे सरन्यायाधीशांकडून कौतुक

नवी दिल्लीः तुम्हाला जामीन हवा की कारागृहवास? आज श्रीकृष्ण कारागृहात जन्माला आला. मग तुम्हाला आज कारागृहातून बाहेर यायचेय का?’

११ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी होती आणि भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी एका आरोपीच्या जामीनावर वरील भाष्य केले.

एका हत्याप्रकरणात धर्मेंद्र वळवी हे जन्मठेप भोगत असून त्यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बोलताना सरन्यायाधीशांनी वळवी यांच्या वकिलांना कृष्णाचा जन्म झालेल्या जन्माष्टमीबद्दल प्रश्न विचारला.

त्यावर वकिलांनी आपल्या अशीलाला जामीन हवा आहे असे सांगितले असता सरन्यायाधीशांनी, ‘ठीक आहे पण मला वाटते तुम्ही धर्माशी जोडले गेलेले नाही’, असे विधान केले.

त्यानंतर सरन्यायाधीशांनी वळवी यांना २५ हजार रु. जातमुचलक्यावर जामीन दिला.

हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार धर्मेंद्र हे काँग्रेस पक्षाचे सदस्य असून त्यांच्यासह अन्य ५ कार्यकर्ते १९९४मध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्या प्रकरणात जन्मठेप भोगत आहेत.

धर्मेंद्र व त्यांच्या ६ साथीदारांना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या शिक्षेवर सप्टेंबर २०१७मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयावर वळवी व अन्य आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे पण त्यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0