कमला हॅरिसः डेमोक्रेट्सतर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

कमला हॅरिसः डेमोक्रेट्सतर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या उमेदवारीच्या निवडीत मंगळवारी दुपारी डेमोक्रेटिक पक्षाने उपाध्यक्षपदासाठी मूळ भारतीय वंशाच्या सिनेटर कमल

विदुषकांच्या हाती जगाची दोरी
ट्रम्प यांच्या जनगणनेच्या योजनेमध्ये डेटाच्या गैरवापराची भीती
जाहीर चर्चांची पुस्तकं

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या उमेदवारीच्या निवडीत मंगळवारी दुपारी डेमोक्रेटिक पक्षाने उपाध्यक्षपदासाठी मूळ भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बिगर श्वेतवर्णिय  महिलेला एखाद्या मोठ्या पक्षाने उपाध्यक्षपदासाठी संधी दिली आहे.

डेमोक्रेटिक पक्षाने अध्यक्षपदासाठी यापूर्वी ज्यो बायडेन यांचे नाव निश्चित केले आहे पण त्याची घोषणा पुढील आठवड्यात होणे अपेक्षित आहे. मंगळवारी बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव घोषित करताना येत्या नोव्हेंबर होणार्या अध्यक्षीय निवडणुकांत ट्रम्प यांचा आपण पराभव करू आणि अमेरिकेला संकटाच्या खाईतून बाहेर काढू अशी प्रतिक्रिया दिली.

ऐतिहासिक नोंद होईल का?

डेमोक्रेट पक्षाचे नेते ज्यो बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून आल्यास कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होतील पण त्यांच्या नावाची पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या राजकीय इतिहासात नोंद होईल. त्याचबरोबर अमेरिकेच्या पहिल्या भारतीय-अमेरिकी व आफ्रिकी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्या नावाची नोंद होईल.

५५ वर्षांच्या कमला हॅरिस यांचे वडील आफ्रिकी असून आई भारतीय आहे. कमला हॅरिस सध्या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर आहेत. पण दीड वर्षांपूर्वी त्या डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत पुढे होत्या. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी आपले नाव मागे घेतले व बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.

दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे नेते ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या डेमोक्रेटिक पक्षाकडून जाहीर झालेल्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीवर उपहास व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. हॅरिस यांनी प्राथमिक फेरींमध्येच वाईट कामगिरी केली आहे. त्या आता कशी कामगिरी करतात ते पाहू. हॅरिस अनेक कारणाने यापूर्वी चर्चेत होत्या त्यामुळे त्यांची बायडेन यांनी घोषणा केलीच कशी याचे आश्चर्य वाटत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0