गुजरातमध्ये बजरंग दलाकडून ‘कामसूत्र’ची होळी

गुजरातमध्ये बजरंग दलाकडून ‘कामसूत्र’ची होळी

नवी दिल्लीः हिंदू देवदेवतांचा अपमान होत असल्याचे कारण देत अहमदाबाद येथे एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी ‘कामसूत्र’ या ल

युतीसाठी मायावतींशी संपर्क साधला पण त्यांनी दुर्लक्ष केलेः राहुल गांधी
पीएम केअर फंडाबाबत केंद्राला सर्वाधिकार
मोदींचा अ-राजकीय आणि आभासी संवाद

नवी दिल्लीः हिंदू देवदेवतांचा अपमान होत असल्याचे कारण देत अहमदाबाद येथे एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी ‘कामसूत्र’ या लैंगिक शास्त्रावर आधारित ग्रंथाच्या काही प्रती शनिवारी रात्री जाळल्या. बजरंग दलाचे कार्यकर्ते या वेळी हर हर महादेव, जय श्री रामचे नारेही देत होते. या घटनेचे व्हीडिओही सोशल मीडियात पसरवण्यात आले.

अहमदाबाद शहरातील लॅटिट्यूड बुकस्टोर येथे ही घटना घडली. लॅटिट्यूड हे दुकान सारखेज-गांधी नगर महामार्गावर आहे.

इसवी सन तिसर्या वा चौथ्या शतकात वात्सायन या तत्वचिंतकाने प्रेम, संभोग व ब्रह्मानंद यांना केंद्र स्थानी धरून ‘कामसूत्र’ हा ग्रंथ लिहिला होता. ज्या काळात जातीवर आधारित ग्रंथ निर्मिती होत होती, त्या काळात जात, धर्म व वर्गाला वगळून वात्सायनने कामसूत्र ग्रंथाची निर्मिती केली होती, असे मत लेखिका व संशोधिका वेंडी डॉनिंगर यांनी त्यांच्या पुस्तकात मांडले होते.

शनिवारी रात्रीच्या सुमारास बजरंग दलाचे काही कार्यकर्ते दुकानात आले व त्यांनी कामसूत्राच्या प्रती दुकानात का विक्रीस आहेत, अशी विचारणा करत दमबाजी करण्यास सुरूवात केली. ही पुस्तके येथे विकता कामा नये असेही या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. कामसूत्रमध्ये कृष्णाचे चित्रण विपर्यस्त पद्धतीने केले असून हा हिंदू देवदेवतांचा अपमान असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. या पुढे दुकानात कामसूत्राची विक्री आढळून आल्यास दुकानाला आग लावण्यात येईल, अशी धमकी कार्यकर्त्यांनी दुकानादारास दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0