बीबीसी वर्ल्ड न्यूजवर चीनमध्ये बंदी

बीबीसी वर्ल्ड न्यूजवर चीनमध्ये बंदी

बीजिंगः चीनमधील घटनांचे वृत्तांकन करताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत चीनच्या सरकारने ब्रिटनच्या बीबीसी वर्ल्ड न्यूजवर शुक्रवारपासून बंद

अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी; दुसरी वस्ती बांधली
चीन कम्युनिस्ट पार्टीची शक्तिशाली यंत्रणांमध्ये ‘घुसखोरी’?
भारत-अमेरिका चर्चेवर चीन नाराज

बीजिंगः चीनमधील घटनांचे वृत्तांकन करताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत चीनच्या सरकारने ब्रिटनच्या बीबीसी वर्ल्ड न्यूजवर शुक्रवारपासून बंदी घातली आहे. चीनमधील बीबीसीचे वृत्तांकन सत्यावर आधारित व तटस्थ स्वरुपाचे दिसत नसून त्यांच्या वृत्तांकनामुळे चीनचे राष्ट्रीय हित व राष्ट्रीय एकतेवर आघात होत असल्याचा गंभीर आरोप चीनच्या सरकारने बीबीसीवर ठेवला आहे. परदेशी वृत्तवाहिन्यांनी चीनमधील घटनांचे वृत्तांकन करताना जी पथ्ये पाळायला हवीत ती पाळली जात नाहीत, त्यामुळे पुढील एक वर्ष तरी बीबीसीच्या प्रसारणावर बंदी राहील, असे चीनच्या सरकारने स्पष्ट केले आहे.

चीनच्या या निर्णयावर आपली नापसंती व्यक्त करत बीबीसीने आमच्या संस्थेमार्फत कोणतेही वृत्त तटस्थपणे, सत्यतेवर, पुराव्यानिशी दिली जाते. त्याचबरोबर आमची पत्रकारिता कोणाच्याही दबावाखाली, भीतीखाली नसते असे उत्तर दिले आहे.

चीनबरोबर हाँग काँग सरकारनेही बीबीसीचे कार्यक्रम प्रसारण करण्यास स्थगिती दिली आहे. हाँग काँगमधील रेडिओ टेलिव्हिजन या संस्थेद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. त्यांनी चीनच्या निर्णयानंतर आपला निर्णय जाहीर केला.

वास्तविक चीनमधील केबल ऑपरेटर त्यांच्या वृत्तवाहिन्यांच्या पॅकेजमध्ये बीबीसी न्यूजला स्थान देत नाहीत. त्यामुळे ही वाहिनी सर्वसामान्य चिनी नागरिकांना पाहताही येत नाही. पण चीनमधील काही हॉटेल व काही विशिष्ट नागरी भागात ही वाहिनी पाहता येते. पण गेल्या दोन दिवसांपासून याही भागात ही वाहिनी दिसत नसल्याचे रॉयटर्सच्या दोन प्रतिनिधींनी सांगितले.

चीनवर ब्रिटनची टीका

बीबीसीवर बंदी घातल्यामुळे चीन व ब्रिटनमध्ये तणाव निर्माण झाला असून ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी चीनच्या निर्णयावर टीका केली आहे. अशी बंदी आणून चीनचे सरकार प्रसार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करत आहे. चीनमध्ये असेही प्रसार माध्यमे व इंटरनेटवर कमी अधिक प्रमाणात बंदी घालण्यात आलेली आहे, त्यात बीबीसीवर बंदी आणल्याने चीनची जगभरातील प्रतिमा कलंकित झाल्याची प्रतिक्रिया राब यांनी दिली.

ब्रिटनपाठोपाठ अमेरिकेच्या परराष्ट्रखात्यानेही चीनच्या या निर्णयाचा निषेध करत चीन सरकार प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी करून स्वतःच्या नेत्यांचा अप्रचार करायला मोकळे झाले आहे, असा आरोप केला आहे.

चीनच्या कारवाईचे कारण

काही दिवसांपूर्वी बीबीसीने, चीनच्या प्रशासनाकडून वांशिक समुदाय विईघुर व अन्य मुस्लिम महिलांवर योजनाबद्ध रितीने अत्याचार व लैंगिक शोषण केले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने त्याचे खंडन केले होते. चीनने त्यांच्या शांगजिंग प्रांतात अशी कोणतीच घटना झाली नसल्याचे स्पष्ट करत बीबीसीचे वृत्त तथ्यहिन व पुरावेहीन असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये संबंध चिघळले होते.

४ फेब्रुवारी २०२१ रोजी ब्रिटनची प्रसार माध्यम नियामक संस्था ऑफकॉमने चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कचा रद्द केलेला परवाना पूर्ववत केला होता. या कंपनीचा ब्रिटनमधील परवान्याच्या गैरवापर स्टार चायना मीडिया लिमिटेड, कंपनीकडून होत असल्याचा आरोप ऑफकॉमचा होता. त्याला चीनच्या सरकारने आक्षेप घेतला होता.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: