केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे बदल

केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात मोठे बदल केले असून, मंत्र्यांची भली मोठी जंत्री केली आहे.

सर्वसामान्यांना निवडणूक निकालांबद्दल काय वाटतं? काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया
जेटलींची राजीव गांधीना क्लीन चीट !
भाजप हा संपूर्ण भारताचा पक्ष नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे.

ज्यांच्या खात्यांमुळे मोदी सरकारवर टीका झाली, त्या मंत्र्यांना काढून टाकण्यात आले. १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले. विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी राजीनामे दिले. रमेश पोखरीयाल, प्रताप सारंगी, डेबश्री चौधरी, संतोष गंगवार, सदानंद गौडा, रतन लाल कटारिया, बाबूल सुप्रियो, अश्विनी चौबे यांचा राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये समावेश आहे.

नव्या ४३ मंत्र्यांमध्ये ७ महिला मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या ४ मंत्र्यांनी शपथ घेतली असून उत्तर प्रदेशच्या ७ मंत्र्यांचा समावेश आहे.

मंत्रीमंडळ

नरेंद्र मोदी – विज्ञान-तंत्रज्ञान

अमित शाह – गृहमंत्री, सहकार

पीयूष गोयल – वस्त्रोद्योग

स्मृती इराणी – महिला बाल कल्याण

ज्योतिरादीत्य सिंदीया – नागरी विमान वाहतूक मंत्री

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण

नारायण राणे – मध्यम आणि लघु उद्योग

हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम, शहर विकास

सारबानंद सोनोवाल – बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय

मनसुख मांडवीय – आरोग्य

अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती तंत्रज्ञान

अनुराग ठाकूर – माहिती प्रसारण

गिरीराज सिंह – ग्राम विकास

आर के सिंग – ऊर्जा

किरण रिजीजू – सांस्कृतीक

पशुपतीकुमार पारस – अन्न प्रक्रिया मंत्री

गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री

पुरुषोत्तम रुपाला – मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

राज्य मंत्री

भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

कपिल पाटील – पंचायतराज राज्य मंत्री

रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री

भागवत कराड – अर्थ राज्य मंत्री

भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री

प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री

सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री

राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री

विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री

शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री

मुंजपरा महेंद्र – महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री

जॉन बारला – अल्पसंख्याक राज्यमंत्री

एल. मुरुगन – मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री

निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री

अनुप्रिया पटेल – उद्योग राज्यमंत्री

एस. पी. बघेल – कायदा व न्याय राज्यमंत्री

राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री

शोभा करंदलजे – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

दर्शन जरदोश – टेक्स्टाईल, रेल्वे राज्यमंत्री

व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कार्य राज्यमंत्री

मीनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री

अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री

अजय भट – संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री

अजय कुमार – गृह राज्यमंत्री

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0