पटनाः जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सोमवारी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री बेतिया येथील भाजपच्या नवनिर्वाचित आमदार रेणू देवी व
पटनाः जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सोमवारी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री बेतिया येथील भाजपच्या नवनिर्वाचित आमदार रेणू देवी व कटिहार येथील नवनिर्वाचित आमदार तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या वेळी कॅबिनेटसाठी १४ जणांना शपथ देण्यात आली. यात भाजपचे ७, जेडीयूचे ५, हमचा १ व वीआयपीच्या एका आमदाराला संधी देण्यात आली आहे.
गेली १५ वर्षे बिहारचे उपमुख्यमंत्री भूषवणारे सुशील मोदी यांना मात्र यावेळी संधी देण्यात आली नाही.
या शपथविधीच्या निमित्ताने आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन केले पण खुर्चीची महत्त्वाकांक्षा ठेवण्यापेक्षा १९ लाख रोजगारांचे दिलेले आश्वासन, शिक्षण, आरोग्य, सिंचन यावर सरकारने लक्ष्य द्यावे असा सल्ला दिला.
या शपथविधीवर काँग्रेस व आरजेडीने बहिष्कार घातला होता. बिहारचा कौल जेडीयू-एनडीएविरोधातला आहे, तो यांनी स्वीकारलेला नाही अशी टीका आरजेडीने केली आहे.
बिहारच्या राजकारणात पहिल्यादांच दोन उपमुख्यमंत्री नेमले गेले आहेत. त्यात रेणू देवी या बिहारच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून निवडल्या गेल्या आहेत. रेणू देवी यांनी यापूर्वी तीन वेळा विधानसभेत निवडून येण्याचा मान पटकावला आहे. २०००, २००५ व २०१०मध्ये त्या निवडून आल्या होत्या. पण २०१५मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०२०मध्ये मात्र त्यांनी पुन्हा निवडून येण्याची किमया दाखवली.
राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या रेणू देवी या लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत. त्यांनी भाजपचे उपाध्यक्षपदही भूषवले होते.
मूळ बातमी
COMMENTS