मॉडर्नाची कोरोना लस ९४.५ टक्के गुणकारी

मॉडर्नाची कोरोना लस ९४.५ टक्के गुणकारी

अमेरिकी कंपनी मॉडर्नाने कोरोना विषाणूवरील आपली लस ९४.५ टक्के गुणकारी असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी फायझर कंपनीने आपली कोरोनावरची लस ९० टक्

लॉकडाऊनमध्ये पारंपरिक मच्छिमार उपाशीच
पालावरचा ‘कोरोना’
कोरोनावर लस मिळाल्याचा पुतीन यांचा दावा

अमेरिकी कंपनी मॉडर्नाने कोरोना विषाणूवरील आपली लस ९४.५ टक्के गुणकारी असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी फायझर कंपनीने आपली कोरोनावरची लस ९० टक्के गुणकारी असल्याचा दावा केला होता, त्या नंतर वैद्यकीय विश्वातील व जगाच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी व आश्वासक घटना आहे.

मॉडर्नाने आपल्या कोरोना लसीची चाचणी अमेरिकेतील ३० हजार रुग्णांवर केली होती. यातील १५ हजार रुग्णांना महिन्याभरात लसीचे दोन डोस दिले होते तर उरलेल्यांना डमी इंजेक्शन दिले होते. क्लिनिक ट्रायलमध्ये भाग घेतलेल्या पहिल्या ९५ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर या लसीचे पृथःकरण करण्यात आले. या चाचणीत कोरोनाची उच्चबाधा झालेल्या ११ रुग्णांनाही लस देण्यात आली होती. या चाचणीनंतर कोरोनाचा संसर्ग झाला नाही. कोरोनावरची आमची लस जवळजवळ परिपूर्ण आहे, असा दावा मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी टाल झॅक्स यांनी केला.

या लसीचे परिणाम काही रुग्णांना वेदना, डोकेदुखी व थोडासा थकवा जाणवला.

मॉडर्ना लसीचे आलेले परिणाम फायझर निर्मित लसीसारखे आले आहेत. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मॉडर्ना कंपनीने म्हटले आहे. या लसीची परवानगी मिळवण्यासाठी येत्या काही आठवड्यात प्रयत्न सुरू केले जातील, असे मॉडर्नाच्या प्रवक्त्याने सांगितले.

फायझरने तयार केलेल्या लसीला उणे ७५ अंश सेल्सियस पर्यंतच्या तापमानात ठेवावे लागत होते. पण मॉडर्नाची लस उणे २० अंश सेल्सियस तापमानात ६ महिन्यापर्यंत ठेवता येऊ शकते व नंतर ती साध्या फ्रीजमध्येही दीर्घकाळ राहू शकते.

लस कशी तयार केली?

आरएनए व्हॅक्सिन म्हणून ही लस विकसित करण्यात आली आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूचा जेनेटिक कोड रुग्णांच्या शरीरात सोडला जातो. त्यानंतर ही लस शरीरात प्रोटीन तयार करत जाते व रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते. ही लस शरीरात प्रतिरोधके तयार करण्यास मदत करते व कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी टी पेशींना मदत करते.

लस केव्हा येईल?

या लसीला परवानगी मिळावी म्हणून मॉडर्ना लवकरच अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज दाखल करेल. कंपनीने अमेरिकेसाठी २ कोटी लस तयार करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. व नंतर हे लक्ष्य १ अब्ज डोसचे असेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0