येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या चार राज्यापैकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या सत्तेसाठी भाजप प्रचंड उत्सुक असून त्यासाठी सर्व क्लृप्त्या आणि फ़ंडे वापरण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
तामिळनाडूमध्ये सत्ताधारी आण्णा द्रमुक पक्षाला शह देण्यासाठी भाजपने तेथील जनतेच्या गळ्यातील ताईत आणि कॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांचा खांदा घेण्याचा प्रयत्न केला होता. रजनीकांत यांना राजकारणात आणून त्यांच्या नवीन पक्षाद्वारे आपले इप्सित साध्य करण्याची इच्छा भाजपची होती. अण्णा द्रमुकचे जेवढे कमी आमदार निवडून येतील तेवढे युतीमध्ये असूनही आपली बार्गेनिग पॉवर वाढेल असा कयास होता. बिहार फॉर्म्युला प्रमाणे रजनीकांत यांच्या पक्षाच्या

सौरव गांगुली फॅन्स फेसबुक पेज तेलंगणा
खांद्यावर बंदूक ठेवून एआयडीएमकेचे शिलेदार टिपण्याची तयारी होती. पण अचानक रजनीकांत यांना उच्च रक्तदाब त्रास सुरू झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयातून घरी आल्यानंतर रजनीकांत यांनी देवाचा कौल म्हणून आपण राजकारणात येणार नसल्याचे जाहीर करून भाजपच्या मन्सूब्यावर पाणी फिरवले. एका अर्थाने रजनीकांत यांनी चक्रव्यूहातुन स्वतःची सुटका करून घेतल्याचे मानले जाते.
अगदी याच वेळी पश्चिम बंगालमध्येही अशीच एक स्क्रिप्ट लिहिली जात आहे. कोणत्याही स्थितीत ममता दीदी यांना सत्तेबाहेर काढायचेच म्हणून दस्तुरखुद्द गृहमंत्री अमित शाह इरेला पेटले आहेत. तृणमूलची शक्ती आणि त्यांची बलस्थाने कमजोर करण्यासाठी दिगग्ज नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे. तर ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांना हाताशी धरून साम दाम भेद दंड या नीतीने राजकारण करण्यात येत आहे. याच बंगालमधील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली. हाच चेहरा निवडणुकीत मते खेचू शकतो हे पाहून तशा हालचाली सुरू झाल्या. अमित शाह यांच्या दोन ते तीन कार्यक्रमात गांगुली यांची उपस्थिती बरेचसे काही सांगून जाणारे ठरले. या संशयाला बळकटी देण्याचे काम गांगुली यांच्या राज्यपाल भेटीने केले.
पण अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर आल्यावर गांगुली सुद्धा रजनीकांत यांचीच री ओढणार की राजकारणाच्या जाळयात अडकून आपली विकेट काढून घेणार हे लवकरच समजेल.
अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS