नवी दिल्लीः २०१४पासून दररोज देशात २ नव्या महाविद्यालयांची स्थापना मोदी सरकारकडून केली जात असल्याचा भाजपचा दावा सरकारी आकड्यांमुळे खोटा ठरला आहे. ७
नवी दिल्लीः २०१४पासून दररोज देशात २ नव्या महाविद्यालयांची स्थापना मोदी सरकारकडून केली जात असल्याचा भाजपचा दावा सरकारी आकड्यांमुळे खोटा ठरला आहे.
७ सप्टेंबरला भाजपने एक ट्विट करून २०१४नंतर मोदी सत्तेत आल्यानंतर दरदिवशी दोन महाविद्यालये उघडले असल्याचा दावा केला होता. पण हा दावा किती फोल व खोटा असल्याची माहिती मोदी सरकारच्या आकडेवारीवरून लक्षात येते.
केंद्रीय शिक्षण खात्याने ३० सप्टेंबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१९ या दरम्यानचा एक सर्वे प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार देशात या काळात ७२ उच्चशिक्षण संस्था स्थापन केल्या गेल्या असून त्यामध्ये ५ केंद्रीय विद्यापीठे व ६७ राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्याला ३० सप्टेंबर २०१९ मध्ये १,९५३ दिवस झाले. जर दरदिवशी २ महाविद्यालये स्थापन झाले असे गृहित धरले तरी संख्या ३,९०६ इतकी होते. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण २०१९-२० नुसार भारतात खासगी विद्यापीठांची संख्या २०१५-१६मध्ये २७६ होती ती संख्या २०१९-२०मध्ये ४०७ इतकी झाली. या आकडेवारीनुसार हे लक्षात येते की मोदी सरकारच्या काळात खासगी विद्यापीठांची संख्या अभूतपूर्व अशी वाढलेली दिसून येते.
भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणानुसार २००३ सालापासून दरवर्षी भारतात १ हजाराहून अधिक महाविद्यालये स्थापन होत असून त्यात ८० टक्के संस्था या खासगी आहेत व अन्य सरकारी आहेत.
२००७ ते २००९ दरम्यान देशात ७,२०६ नवी महाविद्यालये स्थापन झाली होती.
भाजपचा दावा आहे की, ३० सप्टेंबर २०१३मध्ये देशात ३६,६३६ महाविद्यालये होती. हा आकडा ३० सप्टेंबर २०१९मध्ये ४२,३४३ इतका होता. या आकडेवारीवर असे म्हणता येते की त्या ६ वर्षांत ५,७०९ महाविद्यालये स्थापन झाली.
पण सरकारी आकडेवारीनुसार या ६ वर्षांत १,३३५ सरकारी महाविद्यालये स्थापन झाली. यात आकडेवारीत ७५ उच्चशिक्षण संस्था धरल्या तर हा आकडा १,४०७ इतका होतो. जो भाजपच्या दाव्या पेक्षा खूप कमी आहे.
मूळ बातमी
COMMENTS