महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक

नारायण राणे यांना हजेरी द्यावी लागणार
बनावट टूलकिटप्रकरणः पात्रा, रमणसिंहविरोधात गुन्हे
बंगालमध्ये नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

याच प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी आणि संजय जोशी यांनाही दोषमुक्त करण्यात आले आहे.

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी न्यायालयाच्या निकालानंतर व्यक्त केली.

महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आमच्यावर करण्यात आलेला आरोप खोटा असल्याचे आम्ही वारंवार संगत होतो. त्यावर आता न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या बांधकामात कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळालेला नाही. या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. मात्र, गणेशोत्सवापूर्वी आमच्यावरील हे संकट दूर झाले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर छगन भुजबळ यांना दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

आपले नाव या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी विनंती करणारी याचिका भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सत्र न्यायालयाने भुजबळांना दोषमुक्त केले.

यानंतर भुजबळ यांनी एका शेरच्याद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘साजिशे लाखो बनती हैं, मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाऐं है, जो उन्हे मुक्कमल नहीं होने देती’. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांचेही आभार मानले. त्याच प्रमाणे मंत्रिमंडळात घेतल्याप्रकरणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0