ब्राझील- भारत बायोटेक (कोवॅक्सिन) करार रद्द

ब्राझील- भारत बायोटेक (कोवॅक्सिन) करार रद्द

रियो दी जानेरो/हैदराबादः भारत बायोटेक कंपनीची कोविड-१९वरील लस कोवॅक्सिन ब्राझील सरकारने घेण्यास नकार दिला आहे. ब्राझिल सरकार व भारत बायोटेक या दोघांमध

अ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात
देशभंजक नायक
अ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट

रियो दी जानेरो/हैदराबादः भारत बायोटेक कंपनीची कोविड-१९वरील लस कोवॅक्सिन ब्राझील सरकारने घेण्यास नकार दिला आहे. ब्राझिल सरकार व भारत बायोटेक या दोघांमधील करारामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार दिसत असल्याचे कारण ब्राझील सरकारने देत करारच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्राझीलने भारत बायोटेककडून ३२ कोटी ड़ॉलर किंमतीचे २ कोटी कोवॅक्सिन खुराक मागवले होते व तसा करारही करण्यात आला होता. पण या करारात आर्थिक अनियमितता दिसत असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश ब्राझीलच्या अटर्नी जनरलनी दिले होते. कोवॅक्सिनचा करार झाला असला तरी ब्राझील सरकारने अद्याप एकही पैसा भारत बायोटेकला दिलेला नाही.

ब्राझीलमध्ये कोविड लसीकरणाला विलंब होत असल्याने तेथील बोल्सोनारो सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. या सरकारवर कोवॅक्सिन लस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. बोल्सोनारोंविरोधात ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात तक्रारीही विरोधी पक्षांकडून दाखल झाल्या आहेत.

ब्राझीलमध्ये कोरोनाचे ५ लाखाहून अधिक बळी गेलेले असून अजूनही तेथे लसीकरणाचा वेग मंदगतीने सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0