नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)च्या विरोधात देशभर विद्यार्थ्यांची पेटलेली आंदोलने व नागरिकांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने हा कायदा लागू
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)च्या विरोधात देशभर विद्यार्थ्यांची पेटलेली आंदोलने व नागरिकांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने हा कायदा लागू करण्याची अधिसूचना शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केली.
या कायद्यावर खुद्ध पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी परस्परविरोधी विधाने केली होती. पण तरीही हा वादग्रस्त कायदा लागू करण्याचे सरकारने ठरवल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
आज शनिवारी मोदी कोलकात्यात जाणार असून प. बंगालमधील अनेक नागरी हक्क संघटना, डावे पक्षांकडून त्यांच्या दौऱ्यात निदर्शने केली जाणार आहेत. पंतप्रधानांना काळे झेंडेही दाखवण्यात येणार आहेत. पण प. बंगालच्या पोलिसांनी या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
COMMENTS