‘कारवाँ’च्या ३ पत्रकारांना दिल्लीत जमावाकडून मारहाण

‘कारवाँ’च्या ३ पत्रकारांना दिल्लीत जमावाकडून मारहाण

नवी दिल्लीः शहरातील ईशान्य दिल्ली भागात ११ ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास ‘कारवाँ’ या मासिकाचे तीन पत्रकार शाहीद तांत्रेय (असिस्टंट फोटो एडिटर), प्रभ

राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर
टॅटूवाला विराट
दिग्गज लेग स्पीनर शेन वॉर्नचे निधन

नवी दिल्लीः शहरातील ईशान्य दिल्ली भागात ११ ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास ‘कारवाँ’ या मासिकाचे तीन पत्रकार शाहीद तांत्रेय (असिस्टंट फोटो एडिटर), प्रभजित सिंग व एका महिलेला सुमारे १०० जणांच्या जमावाने घेरले व त्यांनी नोंद केलेली माहिती , व्हिडिओ, फोटो नष्ट करण्यास दबाव आणला.

५ ऑगस्टला राममंदिराच्या भूमीपूजनानिमित्ताने ईशान्य दिल्लीत धार्मिक तणाव वाढला होता. एका जमावाने सुभाष मोहल्ला या भागातल्या मशीदीनजीक भगवा झेंडा ठेवला होता व रात्री मुस्लिमविरोधात घोषणाबाजी केली होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी हे तिघे पत्रकार घटनास्थळी गेले होते. त्यांनी व्हिडिओ घेतले तसेच माहितीही घेतली. हे तिघे निघून जात असताना जमाव जवळ आला व त्यांनी या पत्रकारांना त्यांनी घेतलेली माहिती व व्हीडिओ फुटेज नष्ट करण्यास सांगितले. जमावाने महिला पत्रकाराला उद्देशून अश्लिल भाषा वापरली व काही जणांनी त्यांच्या शरीराला स्पर्श केला. एका मध्यमवयीन व्यक्तिने आपले गुप्तांग काढून दाखवले.

नेमके काय झाले

आम्ही तिघे मुस्लिम भागातील दौरा करून हिंदू बहुसंख्य असलेल्या एका गल्लीत शिरलो. या गल्ली क्रमांक-२च्या सुरुवातीस आम्हाला भगवे झेंडे दिसल्याचे शाहीद तांत्रेय यांनी सांगितले. ते पुढे सांगतातः

आम्ही गल्लीच्या कोपर्यात काही महिला उभ्या असलेल्या पाहिल्या. त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही शूटींग सुरू केले. काही घरांचे शूटींगही केले. त्याच वेळी दोन व्यक्ती आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत असे सांगत आले आणि त्यांनी आम्हाला शूटींग घेऊ नका असे बजावले. पण आम्ही तुमचेही म्हणणे घेऊ असे त्यांना सांगितले असता तुमच्यासारख्या भुक्कड पत्रकारांशी आम्हाला बोलायचे नाही, आम्ही त्यांना मारत असतो, अशी प्रतिक्रिया दिली. 

या दोघांची प्रतिक्रिया रेकॉर्ड झाली. त्यानंतर या दोघांनी गल्लीची दोन्हीकडील गेट बंद केले व गल्लीतून तुम्ही आता बाहेर जाऊ शकत नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी शिव्या देण्यास सुरवात केली व व्हिडिओ नष्ट करण्यास सांगितले. या दोघांनी काही फोन केले व लोकांना बोलावण्यास सुरूवात केली. त्यांच्या फोननंतर सुमारे १०० जण तेथे जमा झाले आणि आम्हाला अश्लिल भाषेत सुनावण्यात आले. हे लोक व्हिडिओ नष्ट करण्यास वारंवार सांगत होते. पण आम्ही तुमचा हा खासगी विषय वाटत असेल तर आमच्यावर खटले दाखल करा, असे सांगत होतो व आम्ही व्हिडिओ का म्हणून नष्ट करू असा प्रतिप्रश्नही केला. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते कॅमेर्यापुढे बोला असेही आम्ही त्यांना सांगत होतो. पण ते त्याला नकार देत होते. सुमारे एक तास आमचा हा वाद सुरू होता.

गल्लीची दोन्ही गेट बंद करण्यात आली होती. नंतर काही जणांनी पोलिसांना फोन केला. या दरम्यान काही जणांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथा बुक्क्या मारल्या गेल्या. भगवा कुर्ता घातलेल्या एकाने उपस्थित जमावातील महिलांना आमच्याकडील कॅमेरा काढून घेण्यास सांगितले. त्यामुळे एक महिलेने आपली ओढणी माझ्या गळ्यात घालून माझा श्वास रोखून गळ्यात अडकवलेला कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सर्व फोटो व व्हिडिओ फुटेज नष्ट झाले. तरीही जमाव ऐकत नव्हता. काही जणांनी आमची ओळखपत्रे मागण्यासाठी दबाव आणला. जेव्हा आम्ही ओळखपत्रे दाखवली व त्यातील माझे ओळखपत्र त्यांनी वाचले तेव्हा त्यांनी मला मी मुस्लिम असल्याचे पाहून ‘कटूआ मुसलमान असे अश्लिल शब्द वापरले. त्यानंतर जमाव ऐकण्याच्या तयारीत नव्हता ते मला मारण्याच्या तयारीत होते. हा जमाव घटनास्थळी आलेल्या दोन पोलिसांचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यांच्या देखत आम्हाला जमावाने मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिसही आपल्या हातात काही नाही म्हणून कसेबसे जमावाला शांत करताना दिसत होते. सुदैवाने मी हेल्मेट घातले असल्याने माझ्या डोक्याला मारहाण झाली नाही पण माझी मान व खांदे या मारहाणीमुळे दुखत आहे.’’

शाहीद तांत्रेयला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचा सहकारी प्रभजित सिंग याने मुद्दामून त्याला सागर या हिंदू नावाने हाक मारण्यास सुरूवात केली. पण ओळख पत्रावर मुस्लिम नाव पाहिल्याने जमावाने समोरची व्यक्ती मुस्लिमच असल्याचे पाहून मारहाण करण्यास सुरवात केली.

दरम्यान कारवाँच्या महिला पत्रकाराला या जमावानेही सोडले नाही. काही जणांनी या महिला पत्रकाराला घेरले व त्यांचे फोटो व व्हिडिओ काढण्यास सुरूवात केली. काही जण अश्लिल बोलत होते. एका मध्यमवयीन माणसाने चेहर्यावर विकृत भाव आणत आपले गुप्तांगही काढून दाखवले.

नंतर ही महिला पत्रकार भजनपुरा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी पोहचत असताना जमावाने तिला जबर मारहाण केली. तिच्या चेहर्यावर, हातावर, पार्श्वभागावर व छातीवर जबर मार बसला असून भगवा कुर्ता घातलेला एक युवक व दोन महिला यात सामील असल्याचे या पत्रकाराचे म्हणणे आहे.

तीन पत्रकारांवर जमावाने हल्ले करूनही पोलिसांनी अद्याप साधी फिर्यादही दाखल केली नसल्याचे कारवाँचे राजकीय संपादक हरतोष सिंग बाल यांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0