भाजप नेता कुलदीप सेंगर बलात्कार प्रकरणात दोषी

भाजप नेता कुलदीप सेंगर बलात्कार प्रकरणात दोषी

नवी दिल्ली : उ. प्रदेशमधील उन्नाव येथील भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याला बलात्कार प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर त्याचा साथीदार श

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ फडणवीस रस्त्यावर
कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द
केंद्रस्थानी देवेंद्रच!

नवी दिल्ली : उ. प्रदेशमधील उन्नाव येथील भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याला बलात्कार प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर त्याचा साथीदार शशी सिंहला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. सेंगरला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.

२०१७मध्ये उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण व तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सेंगर याच्यावर होता. सोमवारी सेंगर याला दोषी ठरवण्यात आले तेव्हा तो रडला. सेंगर याला आयपीसी व पॉक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीनवर क्रूर अत्याचार व बलात्कार केल्याप्रकरणात जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने या प्रकरणात आरोपपत्र उशिरा दाखल केल्याबद्दल सीबीआयला फटकारले.

उन्नाव बलात्कार प्रकरणाची पार्श्वभूमी

उत्तर प्रदेशात भाजपचे आदित्यनाथ सरकार आल्यानंतर काही दिवसांतच उन्नाव जिल्ह्यातल्या बांगरमऊ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला. सेंगर यांनी आपले घरातून अपहरण केले व बलात्कार केल्याचा आरोप ही तरुणी व तिची आई करत होती. पण पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही.

अखेर या पीडितीने मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर या प्रकरणाची चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सेंगर व त्यांच्या भावाला अटक करण्यात आली. नंतर पोलिसांनी पीडिताच्या वडिलांना शस्त्रास्त्र बंदी कायद्यांतर्गत अटक केली. पण तिचे वडील तुरुंगातच मरण पावले. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या होत्या.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्नाव येथून भाजपचे साक्षी महाराज निवडून आले होते. त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय देण्यासाठी तुरुंगात जाऊन कुलदीप सिंह सेंगर यांचे आभार मानले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0