स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिजोरीतील सव्वा ५ कोटी रु. चोरीस

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिजोरीतील सव्वा ५ कोटी रु. चोरीस

बडोदाः गुजरातमधील नर्मदा नदीच्या किनार्यावर उभा करण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या अकाउंटमधून ५ कोटी २५ लाख रु. ची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिसांनी या पुतळ्याची व्यवस्था पाहणार्या कंपनीच्या कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बडोद्यातील एचडीएफसी बँकेच्या शाखेने रायटर बिझनेस सर्विस प्राय. लिमिटेड कंपनीच्या कर्मचार्यांविरोधात तक्रार नोंद केली आहे. ही रक्कम ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०२० दरम्यानच्या काळातील चोरीस गेली आहे.

चोरीस गेलेली रक्कम ही ऑफलाइन तिकीट व पार्किग शुल्काचे असून रायटर बिझनेस सर्विस प्राय. लिमिटेड कंपनीकडून ही रक्कम बडोद्यातील एचडीएफसी बँकेत जमा केली जात असते. एचडीएफसी बँकेने या कंपनीला पैसे गोळा करण्याचे काम दिले आहे.

कोविड-१९च्या काळात बँकेकडून काही नियम शिथिल करण्यात आले होते. पण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ऑडिटरना रायटर बिझनेस कंपनीकडून एचडीएफसी बँकेत पैसे जमा न केल्याचे आढळून आले. जेव्हा सर्व रेकॉर्ड तपासले गेले तेव्हा सव्वा पाच कोटी रु.च्या रकमेचा हिशेब लागत नव्हता.

एका अधिकार्याच्या मते ही रक्कम एचडीएफसी बँकेला पोहचवण्यात आली होती आणि बँकेच्या अधिकार्यांना याची माहिती आहे.

नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सीईओ आहेत. त्यांनी या संदर्भात एक समिती स्थापन केली असून त्यात जिल्हा प्रशासन, एचडीएफसी बँक, स्टॅच्यू ऑफ युनिटी व एचडीएफसी बँकेचे एजेंट यांचा समावेश आहे. या रकमेची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची नसून ती बँकेची आहे असा पवित्रा जिल्हाधिकार्यांनी घेतला आहे.

मूळ बातमी

COMMENTS