समीर वानखेडेंवर कारवाई होणार

समीर वानखेडेंवर कारवाई होणार

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलला कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे आर्यन खान व अन्य ५ जणांना क्लिन चीट मिळाली. या प्रकरणाचा

रस्त्यावरील मुले गेली कुठे?
११ जिल्ह्यांत तिसऱ्या पातळीचे कोविड निर्बंध कायम
लॉकडाऊनमुळे गंगा, यमुना स्वच्छ होतेय

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलला कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे आर्यन खान व अन्य ५ जणांना क्लिन चीट मिळाली. या प्रकरणाचा ज्या निष्काळजीपणाने तपास केला याची शिक्षा मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालिन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांना केंद्र सरकारकडून मिळणार आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार केंद्र सरकार समीर वानखेडे यांच्या एकूण तपासावर नाखूष असून त्यांनी अत्यंत निष्काळजीपणाने हे प्रकरण तपासले. या तपासात वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाले. यात त्यांनी बनावट जातप्रमाणपत्र दाखवून नागरी सेवेत प्रवेश केला असा गंभीर आरोप आहे. या आरोपाची सरकार आता चौकशी करणार आहे. वानखेडे हे भारतीय महसूल खात्याचे अधिकारी असून त्यांच्यावर केंद्रीय अर्थखात्याचे नियंत्रण असते. हे खाते वानखेडे यांची चौकशी करणार आहे.

साईल यांच्या आरोपामुळे वानखेडे अडचणीत आले होते

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर काही दिवसानंतर राजकीय वातावरण तापत गेले. त्यात या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप केला. आर्यन खान याच्या सुटकेसाठी बॉलिवूड अभिनेता शाह रुख खान यांच्याकडून २५ कोटी रु.ची मागणी वानखेडेंनी केली होती. या मागणीतील ८ कोटी रु. वानखेडे यांना मिळणार होते, असा खळबळजनक आरोप साईल यांनी प्रसार माध्यमांपुढे केला. या आरोपामुळे वानखेडे अडचणीत आले होते.

साईल हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेले व आर्यन खान याच्यासोबत सेल्फी काढल्याने चर्चेत आलेले किरण गोसावी यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. साईल यांचा पंच क्रमांक १ म्हणून एनसीबीने जबाब घेतला होता पण तो घेण्याआधी कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली, असा आरोप साईल यांनी केला होता.

‘वानखेडे यांची खाजगी फौज

वानखेडे यांची सदोष तपास पद्धती लक्षात आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी रोज वेगवेगळे स्फोटक खुलासे प्रसार माध्यमांपुढे आणण्यास सुरूवात केली.

आर्यन खान याचे अपहरण करून त्याला ड्रग प्रकरणात अडकवण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा डाव होता. ही सगळी समीर वानखेडे यांची फौज असून, आर्यन खान प्रकरणाचा सूत्रधार भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष मोहित कंभोज असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

वानखेडे यांची खासगी फौज सक्रिय आहे, ते महिलांनाही धमकावतात, असा आरोप मलिक यांनी केला. या खाजगी फौजेमध्ये कंभोज यांच्यासह सुनील पाटील, मनीष भानुशाली, किरण गोसावी यांचा समावेश असल्याचे मलिक यांचे आरोप होते.

“आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं. प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंभोज यांच्या भाचाच्या माध्यमातून हे जाळं तयार करण्यात आले. तिथे आर्यन खानला पोहोचवले गेले. आर्यन खानचे अपहरण करून २५ कोटी रु.ची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटी रु.मध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असे मलिक यांचे म्हणणे होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0