नवी दिल्लीः मुलींच्या विवाहाच्या किमान वयोमर्यादेत बदल करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यादिनी केलेल्या आपल्या भाषणात दिले. सध
नवी दिल्लीः मुलींच्या विवाहाच्या किमान वयोमर्यादेत बदल करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यादिनी केलेल्या आपल्या भाषणात दिले.
सध्या मुलींच्या विवाहाचे किमान वय १८ निश्चित करण्यात आले आहे तर मुलांचे २१ आहे. पण मातृ मृत्यूदर कमी करण्याचे उद्दिष्ट्य व पोषण आहाराचा स्तर वाढवण्याच्या दृष्टीने मुलींच्या विवाहाचे किमान वय किती ठेवावे यावर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने गेल्या २ जूनमध्ये एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यात सूचित केलेल्या शिफारशीनुसार मुलींच्या विवाहाचे किमान वय निश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा वाढवल्यास मातृ मृत्यूदर कमी होतील, तसेच महिलांना गरोदरपणात पोषक आहाराची गरज असते. त्यांचे आरोग्य सदृढ राहावे याचा विचार करून वयात बदल केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यासंदर्भातले निर्देश सरकारला दिले होते.
महिलांच्या आरोग्यासंदर्भात सरकार अथक प्रयत्न करत असून देशातील ५ लाख महिलांना एक रुपयात स्वस्त सॅनिटरी नॅपकिन वाटप केल्याचा दावा मोदींनी केला होता.
सध्या हिंदू विवाह कायदा, १९५५ कलम ५(३)नुसार मुलींचे विवाहाचे किमान वय १८ तर मुलांचे वय २१ निश्चित करण्यात आले आहे. त्या खालील वयाच्या मुलामुलींचा विवाह बालविवाह ठरवला जातो.
मूळ बातमी
COMMENTS