काश्मीरमध्ये कर्नल, मेजरसह ५ जवान चकमकीत शहीद

काश्मीरमध्ये कर्नल, मेजरसह ५ जवान चकमकीत शहीद

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात एका गावात रविवारी दहशतवादी व सुरक्षादलाच्या चकमकीत एक कर्नल, मेजरसह, लान्स लायक, रायफलमन व ३ जवान शहीद झाले

काश्मीरातल्या ४५० जणांची परदेशवारी रोखली
आम्ही पर्यटक आहोत : विदेशी शिष्टमंडळाची काश्मीर भेट
सरकारच ठरवणार फेक न्यूज व पत्रकारितेची परिभाषा

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात एका गावात रविवारी दहशतवादी व सुरक्षादलाच्या चकमकीत एक कर्नल, मेजरसह, लान्स लायक, रायफलमन व ३ जवान शहीद झाले तर २ दहशतवादी ठार झाल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

शहीद जवानांची नावे कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, जम्मू-काश्मीर पोलिस उपनिरीक्षक शकील काजी अशी असून शनिवारी रात्री हंदवाडातील चांजमुल्ला या गावात एका घरात काही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलिस ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने कारवाईस सुरवात केली. या कारवाईचे नेतृत्व आशुतोष शर्मा यांच्या टीमकडे होते. या टीमने ओलिस नागरिकांना सोडण्याच्या प्रयत्न सुरू करताच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला.

रविवारी जेव्हा कर्नल व त्यांच्या टीमशी संपर्क होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षादलाने मोठी शोध मोहीम हाती घेतली तेव्हा त्यांना ही दुर्दैवी घटना निदर्शनास आली. यात दोन दहशतवाद्यांचेही मृतदेहही सापडले. ओलीस नागरिकांची सुटकाही झाल्याचे समजते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0