भाजपला टाटाकडून ३५० कोटींची देणगी

भाजपला टाटाकडून ३५० कोटींची देणगी

नवी दिल्ली : २०१८-१९ या एक वर्षांत भाजपला देणगीच्या रुपात ७०० कोटी रु. हून अधिक रक्कम मिळाली. यातील सुमारे ३५६ कोटी रु.ची रक्कम देणगीच्या स्वरुपात टाट

भाजप मोदी लाटेवर स्वार की पैशांच्या लाटेवर?
निर्यातीत ५.४ टक्के घसरण
राज्यामध्ये सरकार नेमके कोणाचे आहे?

नवी दिल्ली : २०१८-१९ या एक वर्षांत भाजपला देणगीच्या रुपात ७०० कोटी रु. हून अधिक रक्कम मिळाली. यातील सुमारे ३५६ कोटी रु.ची रक्कम देणगीच्या स्वरुपात टाटा समूहाच्या नियंत्रणातील ‘द प्रोगेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’कडून मिळाल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या देणग्यांची यादी पाठवत असतात. त्यातून ही माहिती बाहेर आली आहे. २० हजार रु.हून अधिक रक्कम मिळालेल्या देणगीदारांची नावे आयोगाला कळवणे हे सक्तीचे असते.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार २०१८-१९मध्ये भाजपला विविध कंपन्यांच्या निवडणूक ट्रस्टकडून ४७० कोटी रु. देणगीच्या रुपात मिळाले होती तर २०१७-१८मध्ये ही रक्कम १६७.८० कोटी रु. इतकी होती.

देशातल्या अनेक बड्या कंपन्या आपल्या वार्षिक उलाढालीतील काही हिस्सा राजकीय पक्षांना देणगीच्या रुपात देत असतात. ही रक्कम देण्यासाठी ते स्वत:चा निवडणूक ट्रस्ट स्थापन करतात. हे ट्रस्ट समाजातील धनिक मंडळी, कॉर्पोरेट कंपन्या यांच्याकडूनही पैसा उभा करत असतात.

भारतात प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्टकडून भाजपला ६७ कोटी ३० लाख रु. देणगी मिळाली आहे. या ट्रस्टला देणगी देणाऱ्यांमध्ये भारतीय एअरटेल समूह अग्रेसर असून त्यानंतर हीरो मोटोकॉर्प, ज्युबिलंट फूडवर्क्स, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्स अशा कंपन्यांचा समावेश आहे.

भाजपच्या तुलनेत काँग्रेसला विविध निवडणूक ट्रस्टकडून फार कमी रक्कम मिळाली आहे. २०१८-१९मध्ये काँग्रेसला ९० कोटी रु. मिळाले आहेत. भाजपला ३५६ कोटी रु.ची देणगी देणाऱ्या टाटा समूह नियंत्रित ‘द प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’कडून काँग्रेसला फक्त ५५ कोटी रु. मिळाले आहेत. त्याचबरोबर प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून ३९ कोटी रु., आदित्य बिर्ला जनरल इलेक्टोरल ट्रस्टने भाजपला २८ कोटी रु. दिले आहेत तर काँग्रेस २ कोटी रु. दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0