परदेशी लशींच्या आयातीचा केंद्राचा निर्णय

परदेशी लशींच्या आयातीचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्लीः केंद्र सरकारने परदेशात विकसित झालेल्या कोविड-१९च्या लसींची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोविड-१९ लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी

लसीकरणामधेही ‘शुद्ध देसी रोमान्स’
पीएम केअरः १०० कोटींतील रुपयाही लसीवर खर्च नाही
मोफत लसीकरणाचा गोंधळात गोंधळ

नवी दिल्लीः केंद्र सरकारने परदेशात विकसित झालेल्या कोविड-१९च्या लसींची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोविड-१९ लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक देशांमध्ये कोरोनाला प्रतिबंध करणार्या लसी विकसित झाल्या असून त्या देशांमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्या आहेत. या लसींना भारतात आयात केल्याने देशातील लसीकरण मोहिमेत जाणवणारी लसींच्या टंचाईचा प्रश्न सुटेल असे केंद्राचे मत बनले आहे.

मंगळवारी नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन एडिमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19ची बैठक झाली. या बैठकीत परदेशात विकसित झालेल्या लसींची आयात करण्याबरोबर USFDA (U.S. Food and Drug Administration), EMA (European Medicines Agency), UK MHRA (Medicines and Healthcare products Regulatory Agency), PMDA JAPAN (Pharmaceuticals and Medical Devices Agency) आणि WHO (World Health Organization) च्या यादीत सहभागी झालेल्या आणि इतर देशांत मंजुरी मिळालेल्या लसींना भारतातही मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव केंद्रानेही मान्य केला आहे.

नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन एडिमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19ने असाही प्रस्ताव ठेवला आहे की, परदेशातून आयात केलेल्या लसीचा पहिला वापर १०० जणांवर केला जाईल, त्यांच्यावर ७ दिवस देखरेख ठेवली जाईल व नंतर या लसीला व्यापक लसीकरण मोहिमेत सामील केले जाईल.

मंगळवारी देशात सलग ७ व्या दिवशीही पुन्हा लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर सलग तिसरा दिवस आहे की सलग दीड लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत.

रशियाच्या स्फुटनिक व्हीला मंजुरी

मंगळवारी केंद्रीय औषध महानियंत्रकांनी रशियाची कोविड-१९ प्रतिबंधित लस ‘स्फुटनिक व्ही’ला आयात करण्यास मंजुरी दिली. ही लस हैदराबादेतील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिजमध्ये तयार केली जाईल. ‘स्फुटनिक व्ही’ला रशियाच्या सरकारने पूर्वीच त्यांच्या देशात कोरोना रुग्णांवर वापरण्यात परवानगी देण्यात आली होती. सध्या ही लस जगातील ६० देशांमध्ये वापरली जात आहे.

‘स्फुटनिक व्ही’ भारतात ८५ कोटी खुराक तयार करेल. या लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के इतकी आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0