कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मोदी जबाबदारः राहुल गांधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मोदी जबाबदारः राहुल गांधी

नवी दिल्लीः देशात कोरोनाची आलेली दुसरी भयावह लाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेजबाबदार धोरणांमुळे आली असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी

शपथ घेताना गोगोई यांच्याविरोधात ‘शेम.. शेम’च्या घोषणा
माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
‘तेजस्वी’ वादळ बिहारमध्ये सत्तांतर करेल का?

नवी दिल्लीः देशात कोरोनाची आलेली दुसरी भयावह लाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेजबाबदार धोरणांमुळे आली असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि जे काम केले ते पूर्ण नाटक होते त्यामुळे सध्या भयावह परिस्थिती उभी राहिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशात लसीकरणाचा वेग न वाढवल्यास लवकरच कोरोनाची तिसरी, चौथी, पाचवी लाट येईल असाही इशारा त्यांनी दिला.

मोदी सरकार कोरोना मृत्यूची खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांनी सुचवलेल्या पर्यायांचा सरकारने विचार करणे गरजेचे आहे. त्यांना सोबत घेऊन देशात पसरलेल्या कोरोनाविरोधात यश मिळू शकते असे म्हटले.

राहुल गांधी यांनी मोदींच्या कोविड परिस्थिती हाताळणीवरही टीका केली. मोदी व त्यांचे सरकार यांना कोविड विषाणू समजलाच नाही, त्याचे बदलते स्वरुप त्यांना लक्षात आलेले नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसने दिलेला इशारा त्यांनी मनावर घेतला असता तर आज ही भयावह परिस्थिती उत्पन्न झाली नसती असे गांधी म्हणाले.

मोदींनी पहिल्यांदा कोविडला हरवल्याची घोषणा केली पण वस्तुस्थिती ही आहे की, पंतप्रधान व सरकारला कोरोना विषाणू समजलेला नाही. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत, देशात केवळ ३ टक्के लसीकरण झालेले आहे, आपण लसींची निर्यात का केली असे सवालही गांधी यांनी उपस्थित केले.

राहुल गांधी यांनी देशात लसीकरण वेगाने होण्याची गरजही व्यक्त केली. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची गरज आहे. त्याच बरोबर लॉकडाउन हा तात्पुरता उपाय आहे, लोकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावल्यास त्याचे प्रमाण खाली येईल असे गांधी म्हणाले.

अमेरिकेने त्यांच्या सर्व लोकसंख्येला लस दिली. ब्राझीलने त्यांच्या देशातील ७-८ टक्के नागरिकांना लस दिली. आपण सर्वाधिक लसींची निर्मिती करतो पण आपल्याकडे परिस्थिती विदारक असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या अमेरिका दौर्यावरही त्यांनी टीका केली. परराष्ट्रमंत्री लस डिप्लोमसी करत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत प्रत्यक्षात देशातील ९७ टक्के जनतेला लसच मिळालेली नाही, सरकारने कोरोनाला दरवाजे उघडे करून दिलेले आहेत, असे आरोप गांधी यांनी केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0