मुंबईः गैरव्यवस्थापन व लसीची टंचाई यामुळे देशातील कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा वेग कमालीचा घसरला असून गेल्या २३ मे पासून प्रती १० लाख लोकसंख्येमागे केव
मुंबईः गैरव्यवस्थापन व लसीची टंचाई यामुळे देशातील कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा वेग कमालीचा घसरला असून गेल्या २३ मे पासून प्रती १० लाख लोकसंख्येमागे केवळ ९८० व्यक्तींना कोविडची लस दिली जात असल्याचा एक अहवाल क्रिसिलने दिला आहे. क्रिसिल ही विश्लेषण करणारी कंपनी असून ती रेटिंग, संशोधन, जोखीम, धोरण सल्लागार सेवा देत असते. ही कंपनी अमेरिकी कंपनी एस अँड पी ग्लोबलची सहाय्यक कंपनी आहे.
क्रिसिलच्या मते गेल्या आठवड्यात लसीकरणाचा वेग प्रती १० लाख लोकसंख्येमागे १,४५५ इतका होता. हाच आकडा जागतिक स्तरावर प्रती १० लाख लोकसंख्येमागे ३,५६४ इतका होता.
क्रिसिलच्या मते २३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात लसीकरणाचा वेग २२ टक्क्याने कमी झाला असून त्या अगोदरच्या आठवड्यात हा वेग १५ टक्क्याने कमी झाला होता.
याचा अर्थ असा की, ६ मेच्या आसपास देशातील कोविड लाट अत्युच्च पातळीवर गेली होती. त्यावेळी देशात एकाच दिवशी ४.१४ लाख कोविड संक्रमित रुग्ण आढळले होते. त्यानंतर रोज अडीच लाखाच्या आसपास कोरोना रुग्ण देशात आढळत असून १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात कोविड संक्रमणाचा दैनंदिन आकडा हा ३.३ लाख इतका होता.
क्रिसिलच्या अहवालानुसार महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली या सर्वाधिक लोकसंख्येच्या ठिकाणी लसीकरण अधिक झाले असून मे महिन्यात अन्य राज्यात मात्र लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
पण गेल्या काही दिवसात कोरोना संक्रमणाच्या आकडेवारीत घट होत आहे, त्याच बरोबर कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ होत आहे.
तरीही तामिळनाडू, ओदिशा, आसाम व अन्य राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर दिसत असून उ. प्रदेश, म. प्रदेश व राजस्थानात कोरोनाचा जोर वेगाने कमी होत असल्याचे दिसत आहे.
मूळ बातमी
COMMENTS