रविवारी ‘जनता कर्फ्यु’ – मोदींचे आवाहन

रविवारी ‘जनता कर्फ्यु’ – मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोनो विषाणूचा वाढता संसर्ग, त्याने जगभर घातलेले थैमान पाहता आणि मानवजातीवर आलेले हे अभूतपूर्व संकट पाहता येत्या रविवारी देशातील सर्व जन

कोरोनाची लाट ओसरताच राज्ये गाफील राहिली
कोविडच्या होम टेस्ट किटला आयसीएमआरची मंजुरी
स्थलांतरितांना भय दाखवू नका – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोरोनो विषाणूचा वाढता संसर्ग, त्याने जगभर घातलेले थैमान पाहता आणि मानवजातीवर आलेले हे अभूतपूर्व संकट पाहता येत्या रविवारी देशातील सर्व जनतेने सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत स्वत:हून कर्फ्यू पत्करावा व घराबाहेर पडू नये अशी आवाहनवजा विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली.

कोरोनाचे आव्हान हे संपूर्ण मानवजातीपुढे आलेले एक गंभीर संकट असून संपूर्ण जग त्याविरोधात लढत असल्याचे प्रतिपादन करत मोदींनी स्वत:च्या हालचालीवर स्वत:हून संयम आणल्यास अनेकांना त्याचा फायदा होईल असे सांगितले. या रविवारी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच ते करावे पण संपूर्ण दिवसभर घरी राहावे, स्वत:ची काळजी घ्यावी व इतरांचीही घ्यावी, असे तुमच्याकडून मला सहकार्य हवे आहे, असे मोदी म्हणाले.

गेल्या दोन महिन्यापासून अनेक डॉक्टर, नर्स, रुग्णालयातले कर्मचारी, विमानतळांवरचे कर्मचारी, राज्य प्रशासन कोरोनाविरोधात लढत आहेत. अशांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. अशा व्यक्तींसाठी रविवारी ५ वाजता घराच्या दरवाज्यात, खिडक्यांमध्ये, गॅलरीत उभे राहून टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून, घंटा वाजवून त्यांचे आभार मानावेत, असेही आवाहन त्यांनी केले.

देशात कोरोनाचे मृत्यू ४, रुग्णांची संख्या १७३, २० रुग्ण बरे

गुरुवारी देशभरात कोरोना विषाणू संक्रमणाचा आकडा १७३ गेला असून पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या ४ झाली आहे. पंजाबच्या नवाशहर जिल्ह्यात ७२ वर्षीय वृद्धाला कोरोना संक्रमण झाले होते. ही व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीहून इटली भारत असा प्रवास करत आली होती, असे प्रशासनाने सांगितले.

आतापर्यंत कोरोनाबाधित २० रुग्ण बरेही झाले आहेत.

२२ मार्चपर्यंत कोणत्याही विमानाला भारतात प्रवेश नाही

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाची भीती लक्षात घेता केंद्र सरकारने येत्या २२ मार्च पर्यंत परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व विमानांना प्रवेश बंदी केली आहे. त्याचबरोबर सरकारने ६५ वर्षांवरील व्यक्तींनी व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0