शपथ घेताना गोगोई यांच्याविरोधात ‘शेम.. शेम’च्या घोषणा

शपथ घेताना गोगोई यांच्याविरोधात ‘शेम.. शेम’च्या घोषणा

नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी अखेर गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. ते शपथ घेत असताना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षातील सदस

ओबीसीतून खुल्या प्रवर्गातील जागांसाठी १८ जाने.ला मतदान
स्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या
जेएनयूतील विद्यार्थीनीला पुन्हा अटक

नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी अखेर गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. ते शपथ घेत असताना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षातील सदस्यांनी त्यांच्याविरोधात ‘शेम.. शेम’च्या घोषणा दिल्या. काही सदस्य ‘शेम ऑन यू’, ‘डील’ असे नारे देत होते. या सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी नंतर सभात्याग केला.

गुरुवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर गोगोई यांचे सभागृहात आगमन झाले. ते दिसताच कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ‘वेलकम गोगोई दादा’ अशी हाक मारली व त्यांचे स्वागत केले. भाजपच्या अनेक सदस्यांनीही गोगोई यांचे स्वागत केले. त्यानंतर गोगोई यांनी आपली शपथ वाचली व ते अभिवादन करण्यासाठी सभापतींकडे गेले.

पण गोगोई यांचे विरोधी पक्षाकडून असे स्वागत होईल याची कल्पना कुणालाच नव्हती. राज्यसभेत जेव्हा एखादा नवा सदस्य खासदारकीची शपथ घेत असतो तेव्हा त्याच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या जात नाहीत पण गोगोई यांच्याविरोधात अशा घोषणा देण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

काँग्रेस व डाव्या पक्षांच्या सदस्यांकडून गोगोई यांच्याविरोधात नारेबाजी ऐकल्यावर सभापती वेंकय्या नायडू यांनी अशा विरोधी घोषणा देणे औचित्याला धरून नसल्याचे मत मांडले. या संदर्भातील काही वक्तव्ये सभागृहाच्या कामकाजात नोंद केली जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या सदस्यांना गोगोई यांच्याविषयी तक्रार असेल तर ती त्यांनी सभागृहाबाहेर जाऊन मांडावी असाही त्यांनी सल्ला दिला. प्रत्येक सदस्याला घटनात्मक अधिकार माहिती आहेत, त्याचा उपयोग कुठे व कसा करायचा हेही माहिती आहे. तर त्यांनी सभागृहाबाहेर जाऊन आपले मतस्वातंत्र्य बजावावे पण राज्यसभेच्या नव्या सदस्यत्वाच्या शपथविधीला अशा प्रकारे विरोध करणे हे अयोग्य आहे, असे नायडू म्हणाले. तर कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राज्यसभेच्या परंपरेचे दाखले देत या सभागृहात देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ, व अन्य विषयातील तज्ज्ञ येत असतात, आणि असे नेमण्याची परंपरा मागील सरकारचीही होती तेच आता विरोधाच्या घोषणा देत असल्याबद्दल रवीशंकर प्रसाद यांनी आश्चर्य व्यक्त केले. गोगोई यांचे सभागृहातील योगदान निश्चितपणे अमूल्य राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

६५ वर्षांचे गोगोई हे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि लगेच चार महिन्यात त्यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0