पीएम बैठक ‘सुपर फ्लॉप’- ममतांचा आरोप

पीएम बैठक ‘सुपर फ्लॉप’- ममतांचा आरोप

कोलकाताः देशातल्या कोविड-१९ महासाथीच्या परिस्थिती संदर्भात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व देशातील काही जिल्

कीर्तनाचा ‘जात पॅटर्न’
ठाणे-दिवा ५ वी आणि ६ वी मार्गिका अखेर पूर्ण
बार्टीला ९१.५० कोटींचा निधी

कोलकाताः देशातल्या कोविड-१९ महासाथीच्या परिस्थिती संदर्भात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व देशातील काही जिल्हाधिकार्यांची बोलावलेली बैठक सुपर फ्ल़ॉप झाल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. हे विधान करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलून दिले नाही, आम्ही पुतळ्यासारखे स्क्रीनपुढे स्तब्ध बसून होतो, आम्हा मुख्यमंत्र्यांना मोदींनी बोलू न देता जिल्हाधिकार्यांनाच बोलायला लावून आमचा सर्वांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.

ही बैठक अनौपचारिक व सुपर फ्ल़ॉप होती, आमचा अपमान केला, देशाच्या संघराज्य रचनेला हा नुकसान देणारा प्रयत्न होता, मोदी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यापुढे स्वतःला असुरक्षित समजतात असेही आरोप ममता बॅनर्जी यांनी केले.

या बैठकीत पंतप्रधानांनी प. बंगालमधील कोविड-१९ची परिस्थिती कशी आहे, ऑक्सिजनची किती टंचाई आहे याचीही साधी विचारपूस केली नाही. प. बंगालात काळ्या बुरशीने चार जणांचा मृत्यू झाला असताना मोदींनी काळ्या बुरशीबाबत एकही प्रश्न विचारला नाही असेही ममता म्हणाल्या.

सरकारकडे मोठे मोठे भवन व पुतळे बनवायला वेळ व पैसा आहे पण देशातल्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला वेळ नाही. देश सध्या अत्यंत नाजूक वळणावरून जात आहे पण पंतप्रधान बेजबाबदारपणे वागत आहेत. ही बैठक एक सुपर फ्लॉप होती. दिल्लीचा शहेनशाह सगळ काही ठीक आहे असे म्हणतोय पण प्रत्यक्षात सामान्य माणसे जीवनिशी जात असल्याचाही ममतांनी आरोप केला. सरकारकडे कोविड-१९चा मुकाबला करण्याची एकही योजना नाही, सरकार संक्रमण कमी झाले असल्याचा दावा करत आहे पण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक इतकी वाढ का होत आहे, असे सवालही ममतांनी उपस्थित केले.

ममतांनी गंगा नदीत कोरोनाने मरण पावलेल्या मृतदेहांच्या ढिगार्यावरूनही मोदींवर निशाणा साधला. केंद्राची नमामि गंगे ही योजना मृत्यूपुरी गंगे अशी झाली असून कोरोनाने मेलेल्यांचे मृतदेह गंगेत फेकले जात आहेत. त्याने पाणी प्रदुषित होत असून पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरकार पर्यावरणाशी तडजोड करू शकत नाही. सरकारने परिस्थिती पाहण्यासाठी सीबीआयची पथके तिकडे का पाठवली नाहीत, असा थेट सवालही त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: