नवी दिल्लीः ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना व काही आजार असलेल्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड-१९वरील लस मोफत मिळेल असे सरकारने बुधवारी जाहीर केले
नवी दिल्लीः ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना व काही आजार असलेल्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड-१९वरील लस मोफत मिळेल असे सरकारने बुधवारी जाहीर केले. लसीकरणाचा हा कार्यक्रम १ मार्चपासून देशभर सुरू होणार आहे.
कोविडवरील लस सरकारी व खासगी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येईल. सरकारी रुग्णालयातील लस मोफत असेल तर खासगी रुग्णालयातील लसीसाठी काही रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम सरकार निश्चित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
मूळ बातमी
COMMENTS