कोव्हिड मृत्यूः आर्थिक मदतीचे वेबपोर्टल सुरू

कोव्हिड मृत्यूः आर्थिक मदतीचे वेबपोर्टल सुरू

मुंबई: कोव्हिड-१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५० हजार सानुग्रह सहाय्य देण्यातबाबत राज्य सरकारने एक ऑनलाइन वेब पोर्टल (On

राज्यात नवे निर्बंध लागू
कोविड मृत्यूः अंगणवाडी सेवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख
राज्यात ऑक्सिजनचा दररोजचा वापर वाढला

मुंबई: कोव्हिड-१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५० हजार सानुग्रह सहाय्य देण्यातबाबत राज्य सरकारने एक ऑनलाइन वेब पोर्टल (Online web portal) विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.

यासाठी अर्जदाराने Login – Maharashtra Covid-19 Relief (mahacovid19relief.in) यावर लॉगिन करणे आवश्यक आहे. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाइल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-१९ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-१९ मुळे मृत्यू झाल्याच्या पृष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-०५, दिनांक १३ ऑक्टोबर, २०२१ अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज ७ दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: