नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी व मतमोजणीनंतर राजकीय पक्षांना विजयी मिरवणुका काढण्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घा
नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी व मतमोजणीनंतर राजकीय पक्षांना विजयी मिरवणुका काढण्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. देशात कोरोनाची दुसरी भयावह लाट फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या २ मे रोजी आसाम, तामिळनाडू, प. बंगाल, केरळ व पुड्डूचेरी येथे विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. प. बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान येत्या २९ एप्रिल रोजी होणार असून हा शेवटचा ८ वा टप्पा आहे. काल सातव्या टप्प्यात ७० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते.
निवडणूक आयोगाने विजयी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्या पैकी आयोगाकडून विजयी उमेदवाराला मिळणार्या सर्टिफिकेट वेळी विजयी उमेदवार व दोन कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाने देशभर कोरोना फैलावण्याला केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे गंभीर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आयोगाने तातडीने आपले निर्देश जारी केले. मद्रास उच्च न्यायालयाने कोरोना फैलावल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांवर मानवी हत्येचे गुन्हे दाखल करायला हवेत असेही कडक मत व्यक्त केले होते.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी समाधान व्यक्त केले आहे. आम्ही आमच्या उमेदवारांना व कार्यकर्त्यांना कोविड निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. आमचे कार्यकर्ते कोविड रुग्णांच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS