येस बँकेला डिसेंबर अखेर १८ हजार कोटींचा तोटा

येस बँकेला डिसेंबर अखेर १८ हजार कोटींचा तोटा

नवी दिल्ली : सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या तिमाही अखेर आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या येस बँकेचा एकूण तोटा १८,५६४ कोटी रु.चा होता अशी माहिती शनिवारी उशीरा य

‘फोर्ड’चे भारतातील २ प्रकल्प बंद होणार
महाकाय जहाज हलले, ‘सुएझ’मधील कोंडी सुटली
गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहनविक्री ४.६१ टक्क्याने घसरली

नवी दिल्ली : सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या तिमाही अखेर आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या येस बँकेचा एकूण तोटा १८,५६४ कोटी रु.चा होता अशी माहिती शनिवारी उशीरा येस बँकेच्या प्रशासनाकडून जाहीर झाली आहे.

मोठ्या प्रमाणात वाढलेली कर्ज थकबाकी, बुडीत कर्जे व गुंतवणुकीदारांनी दाखवलेली पाठ यामुळे बँकेची अखेरच्या तिमाहीतील कामगिरी अत्यंत सुमार झाल्याचे दिसून येते. सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात येस बँकेतील एकूण कर्ज थकबाकी ४०,७०९.२० कोटी रु. इतकी होती. ही रक्कम बँकेने दिलेल्या कर्जाच्या १८.८७ टक्के इतकी होती. जुलै ते सप्टेंबरपर्यंत संपलेल्या तिमाहीत बुडीत कर्जांची रक्कम १७,१३४ कोटी रु. वा एकूण कर्जाच्या ७.३९ टक्के इतकी झाल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत बँकेची एकूण थकबाकी गेल्या तिमाहीच्या तुलनेत ९,७५७,२० कोटी रु.हून ११,११४ कोटी रु.इतकी वाढली. या काळात बँकेने खबरदारी म्हणून २४,७६५.७३ कोटी रु. बाजूला ठेवले होते. पण ३१ डिसेंबरला ५,१५०.२ कोटी रु.ची नवी कर्ज थकबाकी जमा झाली असे बँकेचे म्हणणे आहे.

तिसऱ्या तिमाहीत खातेदारांनी काढेल ४० हजार कोटी

येस बँकेसंदर्भात बाजारात सुरू असलेल्या नकारात्मक चर्चांवर सावध पवित्रा घेत या बँकेच्या खातेदारांनी तिसऱ्या तिमाहीत जवळपास ४० हजार कोटी रु.हून अधिक रक्कम काढल्याने बँकेची आर्थिक स्थिती पुन्हा खालावत गेली. सप्टेंबर अखेर बँकेत २.०९ लाख कोटी रु. च्या ठेवी होत्या त्या डिसेंबरमध्ये १.६५ लाख कोटी रु. इतक्या खाली आल्या. ही रक्कम साधारण ४० हजार कोटी रु. इतकी होते. नंतर ५ मार्चपर्यंत पुन्हा १,३७,५०६ कोटी रु. खातेदारांनी काढून घेतले.

येस बँकेच्या इतिहासातील या आर्थिक वर्षांतील तिसरा तिमाही हा सर्वात महत्त्वाचा ठरला कारण येथेच बँकेची प्रकृती ढासळत असल्याचे गुंतवणूकदार, खातेदार व सरकारला स्पष्ट जाणवू लागले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0